व्हॅक्सीन घेतल्यानंतरही कोरोना का होतो?; ‘ही’ आहेत कारणं!

देशात तिसऱ्या टप्प्यामध्ये कोरोना लसीकरण सुरू आहे. (Why Are Some people Testing Positive for Covid-19 Despite Getting Vaccinated? )

व्हॅक्सीन घेतल्यानंतरही कोरोना का होतो?; 'ही' आहेत कारणं!
कोरोना लस घेतल्यानंतर रक्त गोठण्याच्या समस्येबाबत लक्षणांची यादी
Follow us
| Updated on: Apr 10, 2021 | 3:12 PM

नवी दिल्ली: देशात तिसऱ्या टप्प्यामध्ये कोरोना लसीकरण सुरू आहे. अशा वेळी अनेकांना लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं असून कोरोनाच्या लसीवर संशयही व्यक्त केला जात आहे. लस घेतल्यानंतरही कोरोना का होतो, याची कारणं एका अभ्यासातून दिसून आली आहेत. (Why Are Some people Testing Positive for Covid-19 Despite Getting Vaccinated? )

एका अभ्यासानुसार, कोरोनाची लस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता फारच कमी आहे. मात्र, ब्रेकथ्रू केसेसची शक्यता अधिक आहे. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेशनचा एक रिपोर्ट 2 एप्रिल रोजी छापून आला आहे. कोरोनाच्या दोन लस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसच्या दोन आठवड्यानंतर कोरोना संक्रमण न होण्याची 90 टक्के शक्यता असते. तरीही लोक कोरोना संक्रमित होताना दिसत आहेत. यामागे अनेक कारणं आहेत. त्यातील मुख्य कारण म्हणजे व्हॅक्सीनचा डोस चुकीच्या पद्धतीने घेणं हे आहे.

हातावर चुकीच्या ठिकाणी लस दिल्यास

एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, कोरोना व्हॅक्सीनला पुरेसं तापमान मिळालं नाही किंवा कोरोनाची लस हातावर चुकीच्या ठिकाणी दिल्यास कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. कमकुवत इम्यून सिस्टीममुळेही कोरोनाची लागण होऊ शकते. काही लोक कोरोनाचा दुसरा डोस घेण्याआधीही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. मात्र, ज्यांना डोस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग होतो, त्यांच्यामध्ये कोरोनाची अत्यंत सौम्य लक्षण आढळली आहेत, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

24 तासात 1 लाख रुग्ण

दरम्यान, देशात गेल्या चोवीस तासात पुन्हा एकदा एक लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशात मोठं संकट निर्माण झालं आहे. गेल्या चोवीस तासात देशात 1,45,384 नवे रुग्ण सापडेल आहेत. तर कोरोनामुळे 794 लोकांचा मृत्यू झाला असून चोवीस तासात 77,567 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1,32,05,926 झाली आहे. तर कोरोना बळींची संख्या 1,68,436 वर गेली आहे. 10,46,631 रुग्ण उपचार घेत असून 1,19,90,859 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या शिवाय 9,80,75,160 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. (Why Are Some people Testing Positive for Covid-19 Despite Getting Vaccinated? )

संबंधित बातम्या:

व्हॅक्सीन घेतल्यानंतरही कोरोना का होतो?; अदर पूनावाला यांनी दिलं ‘हे’ कारण

बीएमसीकडून मुंबईत कोरोना लसीकरणाचं वेळापत्रक जाहीर, तुम्हाला कधी-कुठं लस घेता येणार? वाचा…

तुमची ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी सोपी टिप्स, केवळ 6 मिनिटे जलद चाला!

(Why Are Some people Testing Positive for Covid-19 Despite Getting Vaccinated? )

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.