Video: 24 तासांत 100 धक्के; तैवान भूकंपाने हादरले

अनेक ठिकाणी इमारती कोसळल्या आहेत. पूल तुटले आहेत आणि रेल्वेचे डबेही उलटले आहेत. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देखील देण्यात आला आहे.

Video: 24 तासांत 100 धक्के; तैवान भूकंपाने हादरले
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 5:26 PM

तायपे : तैवान(Taiwan) भूकंपाने(earthquakes) हादरले आहे. तैवानला 24 तासांत भूकंपाचे 100 धक्के बसले आहेत. भूकंपामुळे तैवानचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी इमारती कोसळल्या आहेत. पूल तुटले आहेत आणि रेल्वेचे डबेही उलटले आहेत. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देखील देण्यात आला आहे.

शनिवारपासून तैवानमधील अनेक भागात भूकंपाचे हादरे बसत आहेत. रविवारी 7.2 रिश्टर स्केलचे झटके बसले. यापूर्वी शनिवारी आलेल्या भऊकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू तैतुंग परिसरात होता.

भूकंपाचे हे हादरे यूजिंग भागात सर्वाधिक जाणवले. हुआलिन परिसरात घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. गेल्या दोन दिवसांत बसलेले हादरे इतके तीव्र होते की अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. रस्त्यांनाही तडे गेले.

भूकंपामुळे तैवानमधील नागरीक भयभित झाले आहेत. अनेक जण जीव वाचविण्यासाठी अद्यापही घराबाहेर आलेले नाहीत.

या घटनेत जीवित हानी झाली नसली नसल्याचे दिलासादायक वृत्त समोर आले आहे. मात्र, सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

भूकंपाचा धोका लक्षात घेता रेल्वे सेवा तूर्तास बंद करण्यात आल्या आहेत. तसेच समुद्र किनारपट्टीवर वसलेल्या शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भूकंपानंतर युनायटेड स्टेट्स त्सुनामी वॉर्निंग सेंटरने त्सुनामीचा इशारा दिला आहे. तैवानच्या सागरी किनार्‍याजवळ त्सुनामीच्या धोकादायक लाटा उद्भवू शकतात. जपानच्या हवामान खात्यानेही याबाबत अलर्ट केले आहे.

भूकंपानंतर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भूकंपामुळे किती नुकसान झाले आहे ते या व्हिडिओतून दिसत आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.