VIDEO : न्यूझीलंडमध्ये 145 व्हेल माशांचा मृत्यू

VIDEO : न्यूझीलंडमध्ये 145 व्हेल माशांचा मृत्यू

वेलिंगटन : न्यूझीलंडच्या समुद्रकिनारी तब्बल 145 पायलट व्हेल मृत मासे आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री एका प्रवाशाने स्टीवर्ट बेटाच्या सुमारे दोन किमी क्षेत्रात दोन गटांमध्ये अडकून पडलेल्या व्हेलमाशांची माहिती प्रशासनाला दिली होती. तेव्हा तातडीने बचावपथक समुद्रकिनारी पोहचले, पण तोपर्यंत 75 माशांचा मृत्यू झाला होता आणि बाकी मासे हे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांनाही मारण्यात आले असे न्यूझीलँडच्या संरक्षण विभागाने सांगितले. न्यूझीलँडच्या रिमोट आर्यलँड समुद्रकिनाऱ्यावर ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून  सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे मासे कोणत्या कारणामुळे मृत पावले आहे याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आजार, दिशा चुकणे, पाण्याचा प्रवाह बदलणे अशावेळी व्हेल मासे सुमद्रकिनारी येतात आणि अडकून पडतात असे तज्ञांचे म्हणणे आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI