440 खेळाडूंचं लैंगिक शोषण, प्रशिक्षकाला 180 वर्षांचा तुरुंगवास

वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये 440 हून अधिक खेळाडूंचे लैंगिक शोषण करणाऱ्या प्रशिक्षकाला न्यायालयाने 180 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. आरोपी प्रशिक्षकावर अल्पवयीन मुलांचा अनेकदा लैंगिक छळ करणे आणि चाईल्ड पॉर्नोग्राफी करण्याचे आरोप होते. यात न्यायालयाने त्याला दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली. ग्रेग स्टेफन (43) असे या दोषी बास्केटबॉल प्रशिक्षकाचे नाव आहे. ग्रेग स्टेफनने 2005 मध्ये अमेरिकेत ‘लोवा …

Physical Abuse, 440 खेळाडूंचं लैंगिक शोषण, प्रशिक्षकाला 180 वर्षांचा तुरुंगवास

वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये 440 हून अधिक खेळाडूंचे लैंगिक शोषण करणाऱ्या प्रशिक्षकाला न्यायालयाने 180 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. आरोपी प्रशिक्षकावर अल्पवयीन मुलांचा अनेकदा लैंगिक छळ करणे आणि चाईल्ड पॉर्नोग्राफी करण्याचे आरोप होते. यात न्यायालयाने त्याला दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली. ग्रेग स्टेफन (43) असे या दोषी बास्केटबॉल प्रशिक्षकाचे नाव आहे.

ग्रेग स्टेफनने 2005 मध्ये अमेरिकेत ‘लोवा बार्नस्टोमर्स’ नावाचा स्पोर्ट क्लब सुरु केला. या क्लबमधून अनेक महाविद्यालयीन खेळाडूंना शिष्यवृत्ती देण्यात येत होती. यात आदिदास या प्रसिद्ध कंपनीचीही भागिदारी होती.

प्रशिक्षणादरम्यान विश्रांतीच्या ठिकाणी मुले थकून झोपलेले असायचे, त्यावेळी ग्रेग त्यांचे नग्न फोटो आणि व्हिडीओ काढायचा. काही काळाने मुलांच्या  विश्रांतीच्या जागेचे दुरुस्ती काम करताना ग्रेगच्या बायकोच्या भावाला एक गुप्त रेकॉर्डींग डिव्हाईस सापडले. त्याने ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या जागेची तपासणी केली असता, त्यांना मुलांचे पॉर्नोग्राफीक व्हिडीओ असलेली ग्रेगची एक हार्ड डिस्क सापडली. या हार्ड डिस्कमध्ये 400 हून अधिक मुलांच्या नावांचे फोल्डर्स होते. त्यात या मुलांचे हजारो फोटो आणि व्हिडीओ होते.

ग्रेगने आपल्या या कृत्यासाठी न्यायालयात माफी मागितली. तो म्हणाला, “माझे प्रशिक्षक म्हणून काम यामुळे उद्ध्वस्त झाले याचा मला पश्चाताप आहे.” ग्रेगच्या या प्रतिक्रियेनंतर त्याच्यावर जोरदार टीका झाली. ग्रेगच्या कृत्याने मुलांचे आणि त्या पालकांचे किती नुकसान झाले याचे त्याला काहीही देणेघेणे नाही. त्याला त्याच्या करियरचीच चिंता असल्याची टीका पालकांनी केली.

दरम्यान, ग्रेगच्या वकिलांनी त्यांचा बचाव करताना न्यायालयाकडे कमी शिक्षेची मागणी केली. तसेच ग्रेग समाजासाठी धोका असणार नाही, असेही सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळली. न्यायालयाने ग्रेगला शिक्षा सुनावताना सांगितले, “आरोपीच्या या कृत्याने पीडित मुलांवर गंभीर परिणाम झाला आहे. त्याची मोजदातही होऊ शकत नाही. त्यामुळे त्याला अधिकाधिक शिक्षा देण्यात येत आहे.”

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *