क्रिप्टोकरन्सीत 1300 कोटी अडकले, पासवर्ड माहित असलेल्याचा मृत्यू

क्रिप्टोकरन्सीत 1300 कोटी अडकले, पासवर्ड माहित असलेल्याचा मृत्यू
क्रिप्टोकरन्सीद्वारे FD आणि RD मध्ये करू शकता गुंतवणूक

वॉशिंगटन : कॅनडाच्या क्रिप्टोकरन्सी फर्म क्वाड्रिगासीएक्सचे फाउंडर आणि सीईओ गेराल्ड कॉटन यांचे भारत दौऱ्यावर असताना निधन झाले. मात्र त्यांच्या मृत्यूने तब्बल 1300 कोटी रुपये लॉक झाले आहेत. कारण या करंसीला अनलॉक करायचा पासवर्ड हा फक्त कॉटन यांच्याकडे होता.

कुणालाच या पासवर्डबाबत काहीही माहित नाही, त्यांच्या पत्नीला देखील या पासवर्डची माहिती नाही त्यामुळे हे पैसे आता लॉक झाले आहेत. मोठ-मोठे सिक्युरिटी एक्सपर्टही हे करन्सी पासवर्ड अनलॉक करु शकत नाही. त्यामुळे आता ग्राहकांचे पैसे कसे परत देणार हा मोठा प्रश्न कंपनीसमोर आहे.

आतड्या संबंधीत आजारामुळे डिसेंबर 2018 मध्ये कॉटन यांचा मृत्यू झाला. मागील आठवड्यात क्वाड्रिगाने कॅनेडा कोर्टात क्रेडिट प्रोटेक्शन याचिका दाखल केली तेव्हा ही करन्सी लॉक असल्याचं समोर आलं. कंपनीने आपल्या ऑफिशिअल पेजवर दिलेल्या माहितीनुसार, कॉटन यांचा मृत्यू तेव्हा झाला जेव्हा ते भारत दौऱ्यावर होते. ते भारतात अनाथ मुलांसाठी एक अनाथालय बनवणार असल्याचंही कंपनीने  सांगितलं.

कॉटन यांनी मृत्यूपूर्वी कुणालाही कधीही पासवर्ड सांगितला नव्हता. जेव्हा त्यांच्या पत्नी जेनिफर रॉबर्टसन आणि त्यांच्या कंपनीकडून कॅनेडाच्या कोर्टात क्रेडिट प्रोटेक्शनसाठी याचिका करण्यात आली तेव्हा ही माहिती समोर आली. या याचिकेनुसार, कॉटनच्या इनक्रिप्टेड अकाउंटला अनलॉक करता येत नाहीये, त्या अकाउंटमध्ये जवळपास 190 मिलिअन डॉलर म्हणजेच 1300 कोटी रुपये लॉक झाले आहेत. कॉटन जो लॅपटॉप वापरायचे तो इनक्रिप्टेड  होता. त्याचा पासवर्ड कुणाकडेही नाही, त्यांच्या पत्नीलाही या लॅपटॉपचा पासवर्ड माहित नाही.

हे पैसे लॉक झाल्याने 1.15 लाख ग्राहकांवर याचा परिणाम होमार आहे. कंपनीचे 3.36 लाख रजिस्टर्ड ग्राहक आहेत, अशी माहिती कॉटन यांच्या पत्नी जेनिफर यांनी कोर्टात दिली.

कॉटन यांच्या मुख्य कंप्यूटरमध्ये क्रिप्टोकरंसीचं कोल्ड व्हॉलेट आहे, जे फक्त फिजीकली एक्सेस करता येतं. याचं पासवर्ड फक्त कॉटन यांनाच माहित आहे. पण त्यांच्या मृत्युनंतर कोल्ड व्हॉलेटमध्ये क्रिप्टोकरन्सी फसली आहे. अशी माहिती जेनिफर यांनी कोर्टात दिली.

काही दिवसांपासून आम्ही आमच्या आर्थिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न  करत आहोत. आम्ही क्रिप्टोकरन्सी अकाउंटचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, त्याला अनलॉक करण्याचा प्रयतंन केला, त्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र आमचे स्रव प्रयत्न अयशस्वी ठरले. आम्हाला आमच्या ग्राहकांना त्यांचे पैसे परत करायचे आहेत, मात्र ते करण्यास आम्ही असमर्थ आहोत, कारण ते अकाउंट आम्ही उघडू शकत नाही, असे कंपनीने सांगितले.

क्रिप्टोकरन्सी काय असते?

जगातील कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि देशाला त्यांच्या मूलभूत आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि परस्पर व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी चलन हे आवश्यक आहे. म्हणून, प्रत्येक देशाचे स्वतःचे स्वतंत्र असे चलन असते, जसे की भारतात रूपया, यूएसमध्ये डॉलर इत्यादी. प्रत्यक्षात, हे एक भौतिक चलन आहे, ज्याला आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो आणि वापरू शकतो, नियमांनुसार कुठल्याही ठिकाणा किंवा देशात याचा वापर करु शकतो. पण, क्रिप्टोकरन्सी हे त्याहून वेगळं आहे. जे एक डिजीटल चलन आहे. आपण ते पाहू शकत नाही किंवा स्पर्शही करू शकत नाही. कारण क्रिप्टोकरन्सीचे मुद्रण केले जात नाही. म्हणूनच याला व्हर्च्युअल चलन म्हणतात.

क्रिप्टोकरन्सी एक असे चलन आहे जे कम्प्यूटर अल्गोरिदमवर बनवले जाते. हे एक स्वतंत्र चलन आहे, ज्याच्यावर कुणाचाही हक्क नसतो. हे चलन कोणत्याही प्राधिकरणाच्या नियंत्रणात येत नाही. तसेच रुपया, डॉलर, डॉलर, युरो किंवा इतर चलनांप्रमाणे हे चलन कोणत्याही राज्य, देश, संस्था किंवा सरकारद्वारे चालवलं जात नाही. हे एक डिजिटल चलन आहे, ज्यासाठी क्रिप्टोग्राफी वापरली जाते. सहसा हे चलन कपठलीही वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा सेवा खरेदी करण्यासाठी वापरली जाते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI