Pulwama Attack : पाकिस्तानी वस्तूंवरील सीमाशुल्कात 200 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आता पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारत सरकारने शनिवारी एक मोठा निर्णय  घेतला. पाकिस्तानवरुन येणाऱ्या सर्व वस्तूंवरील सीमाशुल्कामध्ये 200 टक्के वाढवण्यात आले आहे. पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन (एमएफएन) दर्जा काढल्यानंतर आता तिथून आयात होणाऱ्या वस्तूंवर 200 टक्के सीमाशुल्क लागू करण्यात आले आहे, …

Pulwama Attack : पाकिस्तानी वस्तूंवरील सीमाशुल्कात 200 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आता पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारत सरकारने शनिवारी एक मोठा निर्णय  घेतला. पाकिस्तानवरुन येणाऱ्या सर्व वस्तूंवरील सीमाशुल्कामध्ये 200 टक्के वाढवण्यात आले आहे. पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन (एमएफएन) दर्जा काढल्यानंतर आता तिथून आयात होणाऱ्या वस्तूंवर 200 टक्के सीमाशुल्क लागू करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दिली.

पुलवामाच्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानकडून एमएफएन दर्जा काढल्यानंतर आता आयात होणाऱ्या वस्तूंवर 200 टक्के वाढवण्यात आले आहे, असं ट्वीट करत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं.

सीमाशुल्क वाढवल्यामुळे पाकिस्तानला भारतातून करण्यात येणाऱ्या निर्यातीवर वाईट परिणाम पडणार आहे. वर्ष 2017-2018 मध्ये भारताला पाकिस्तानमधून भारतात 3,482.3 कोटी रुपये म्हणजेच 48.85 कोटी डॉलरची निर्यात करण्यात आली होती. पाकिस्तान भारतातून ताजे फळ, सीमेंट, मोठ्या प्रमाणात खनिज आणि चमड्याचे उत्पादन निर्यात करतो. यामध्ये पाकिस्तानकडून सर्वात जास्त ताजे फळ आणि सीमेंटची आयात केली जाते. यामध्ये असणाऱ्या सीमाशुल्कातील दरात क्रमश: 30 ते 50 टक्के आणि साडे सात टक्के आहे.

पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहे आणि भारतासोबत त्याचा चांगल्या प्रकारे व्यापार सुरु आहे. सीमेवर कितीही तणावाचे वातावरण असले, तरी व्यापारावर याचा काही फरक पडत नव्हता. मात्र आता भारताच्या या निर्णयाने पाकिस्तानला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. तज्ञांनुसार, भारताने जर मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा संपवला, तर पाकिस्तानही भारतासोबत व्यापार थांबवू शकतो. यामुळे भारतालाही याचे नुकसान होऊ शकते. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर भारत आर्थिक नुकसान सहन करेल, पण पाकिस्तनाला माफ करण्याच्या मूडमध्ये दिसत नाही.

मोस्ट फेवर्ड नेशन म्हणजे काय?

मोस्ट फेवर्ड नेशन म्हणजे, जागतिक व्यापार संघटना आणि आंतरराष्ट्रीय ट्रेडच्या नियमांनुसार व्यापारात सर्वाधिक प्राधान्य देणाऱ्या देशाचा दर्जा दिला जातो. एमएफएनचा दर्जा दिल्यानंतर देशाला या गोष्टीचे आश्वासन असते की, व्यवहारात आपल्याला नुकसान होणार नाही.

व्हिडीओ : शहीद जवानांना अखेरचा निरोप, ‘अमर रहे, अमर रहे’ ची सर्वत्र घोषणाबाजी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *