रॉकेट चाचणी करताना स्फोट, 5 शास्त्रज्ञांचा मृत्यू, किरणोत्साराचाही धोका

रशियात रॉकेट चाचणी दरम्यान झालेल्या स्फोटात तब्बल 5 शास्त्रज्ञांचा मृत्यू झाला आहे. अन्य 3 शास्त्रज्ञ स्फोटात भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रशियाने या घटनेला दुजोरा दिला आहे.

रॉकेट चाचणी करताना स्फोट, 5 शास्त्रज्ञांचा मृत्यू, किरणोत्साराचाही धोका
Follow us
| Updated on: Aug 10, 2019 | 7:57 PM

मॉस्को : रशियात रॉकेट चाचणी दरम्यान झालेल्या स्फोटात तब्बल 5 शास्त्रज्ञांचा मृत्यू झाला आहे. अन्य 3 शास्त्रज्ञ स्फोटात भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रशियाने या घटनेला दुजोरा दिला असून उत्तर रशियातील सैन्याच्या तळावर ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.

लिक्विड प्रोपेलन्ट रॉकेट इंजिनची चाचणी सुरु असताना गुरुवारी (8 ऑगस्ट) झालेल्या या स्फोटामुळे किरणोत्सार बाहेर पडत आहे. त्यामुळे परिसरात किरणोत्साराचे प्रमाण वाढत आहे. किरणोत्साराच्या भीतीने स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सुरुवातीला रशियाने हा छोटा अपघात असल्याचे म्हटले होते. मात्र, आता याचे स्वरुप मोठे असल्याचे समोर येत आहे. स्थानिक लोक किरणोत्साराचा दुष्परिणाम टाळण्यासाठी आयोडिनचा उपयोग करत आहेत. रशियाच्या सरकारी अधिकाऱ्यांनी स्फोट झालेली चाचणी बंद केल्याचेही सांगितले आहे.

‘घटनास्थळी वातावरणात किरणोत्सार वाढला’

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सुरुवातीला रॉकेट चाचणीदरम्यान झालेल्या स्फोटात कोणतेही रसायन बाहेर पडले नसल्याचा दावा केला. तसेच दुर्घटना घडली तेथील किरणोत्साराचे प्रमाण देखील सामान्य असल्याचे म्हटले. मात्र, दुर्घटना घडली त्या ठिकाणापासून जवळील काही शहरांच्या वातावरणात किरणोत्सार वाढल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, हा हा किरणोत्सार का वाढला याचं कोणतंही अधिकृत कारण देण्यात आलेलं नाही.

’30 किलोमीटरपर्यंतच्या परिसरात किरणोत्साराचे प्रमाण 20 पटीने वाढले’

काही वेळेतच संबंधित शहरांच्या किरणोत्साराची माहिती इंटरनेटवरुन काढून टाकण्यात आली. ग्रीनपीस संस्थेने रॉकेट स्फोट झालेल्या ठिकाणाच्या आजूबाजूला 30 किलोमीटरपर्यंतच्या परिसरात किरणोत्साराचे प्रमाण 20 पटीने वाढल्याचे म्हटले आहे. यासाठी त्यांनी आपत्कालीन मंत्रालयाच्या आकडेवारीचा आधार दिला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.