78 वर्षांचा नवरदेव, 17 वर्षांची वधू, लग्नानंतर 22 दिवसात घटस्फोटाचा निर्णय

78 वर्षांचा अबा सरना आणि 17 वर्षांची नोनी नविता यांचा विवाह गेल्या महिन्यात अत्यंत थाटामाटात झाला होता

78 वर्षांचा नवरदेव, 17 वर्षांची वधू, लग्नानंतर 22 दिवसात घटस्फोटाचा निर्णय
Follow us
| Updated on: Nov 05, 2020 | 7:22 PM

जकार्ता : 78 वर्षांचा नवरदेव आणि त्याच्या 17 वर्षांच्या वधूच्या लग्नाची गोष्ट इंडोनेशियात (Indonesia) चांगलीच गाजली होती. मात्र हा संसार फुलण्याआधीच त्याला दृष्ट लागली. लग्नाला जेमतेम 22 दिवस होत नाहीत, तोच त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. (78 years old man Abah Sarna married to 17 year old girl Noni Navita gets divorce in 22 days of marriage)

78 वर्षांचा अबा सरना (Abah Sarna) आणि 17 वर्षांची नोनी नविता (Noni Navita) यांचा विवाह गेल्या महिन्यात अत्यंत थाटामाटात झाला होता. सर्वसाधारणपणे आजोबा-नातीच्या वयाचं हे जोडपं. साठपेक्षा अधिक वर्षांचे अंतर असल्यामुळे जगभरातून या जोडप्याच्या लग्नाकडे लक्ष वेधले गेले होते. सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचे फोटो भाव खाऊन गेले.

अबा सरना यांनी नोनीला घटस्फोटाची नोटीस पाठवली. नोटीस पाहून नोनीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. कारण अवघ्या 22 दिवसांत दोघांच्या नात्यात कुठलाच तणाव असल्याचं त्यांना दिसलं नव्हतं. घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासारखी कोणती वादळी घटना घडली, हेच मला समजत नाही, अशा शब्दात नोनीची बहीण इयानने आश्चर्य व्यक्त केलं आहे.

फोटो : फेसबुक

“आमच्या कुटुंबाकडून या लग्नाला कोणतीही आडकाठी नव्हती. मात्र अबा आणि त्यांच्या कुटुंबीयांनीच आता हरकत घेतल्याचं दिसतंय” अशी प्रतिक्रिया नोनीच्या कुटुंबाने दिली आहे.

नोनी लग्नाअगोदरच गरोदर राहिल्याच्या वावड्या उठल्या होत्या. या कारणास्तव अबाने घटस्फोटाचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मात्र नोनीच्या कुटुंबीयांनी हे दावे फेटाळून लावले आहेत.

अबा यांनी लग्नाच्या वेळी दोन हजार 819 मलेशियन रिंगीट (अंदाजे 50 हजार रुपये), बाईक, कपाट असे काही सामान नोनीला भेट दिले होते. हे सर्व सामान ट्रकमध्ये भरुन दिल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नवरदेवाकडून वधूच्या कुटुंबाला हुंडा देण्याची पद्धत इंडोनेशियामध्ये रुढ आहे.

संबंधित बातम्या :

ऐन लग्नात नववधू बेपत्ता, औरंगाबादेत सासर-माहेरचा राडा, नऊ वऱ्हाडी जखमी

ऐन लग्नातच वधू-वरपक्षात राडा, एकमेकांवर खुर्च्यांची फेकाफेक

(78 years old man Abah Sarna married to 17 year old girl Noni Navita gets divorce in 22 days of marriage)

Non Stop LIVE Update
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.