शेख हसीना यांच्या आयुष्यातील 9 महत्त्वाच्या गोष्टी

शेख हसीना यांच्या आयुष्यातील 9 महत्त्वाच्या गोष्टी

बांगलादेशातील संसदेच्या 300 जागांपैकी 275 हून अधिक जागांवर विजय मिळवत, विरोधकांचा सुपडासाफ करत, विद्यमान पंतप्रधान शेख हसीना यांनी पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे सलग चौथ्यांदा शेख हसीना या बांगलादेशच्या पंतप्रधानपदावर विराजमान होणार आहेत. अत्यंत थरारक असा जीवनप्रवास असणाऱ्या शेख हसीन यांच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी….

1. ‘फोर्ब्स’ या जगप्रसिद्ध मासिकाने 2016 साली ‘जगातील सर्वात शक्तिशाली 100 महिलां’ची यादी प्रसिद्ध केली होती. त्यात बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या 36 व्या स्थानावर होत्या.

2. बांगलादेशमध्ये 1970 सालच्या निवडणुकीत मोठी हिंसा झाली होती. त्यावेळी शेख हसीना यांच्या वडिलांना अटक करण्यात आली. शेख हसीना या त्यावेळी आपल्या आजीकडे निर्वासित म्हणून राहिल्या होत्या.

3. 1975 च्या ऑगस्ट महिन्यातील 15 तारीख शेख हसीना यांच्या आयुष्यातील सर्वात भयंकर ठरली. या एकाच दिवशी शेख हसीना यांचे आई-वडील आणि तीन भावांची राहत्या घरात लष्करी अधिकाऱ्यांकडून हत्या करण्यात आली. या भयंकर घटनेनंतर शेख हसीना आणि त्यांची बहीण जर्मनीला गेल्या. त्यांच्या जीवाला भीती होती. त्यामुळे शेख हसीना यांना 1981 पर्यंत बांगलादेशात परतण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. त्यानंतर त्या बांगलादेशात आल्या आणि अवामी लीग पक्षाच्या सर्वेसर्वा बनल्या.

4. शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबर रेहमान हे बांगलादेशच्या संस्थापकांपैकी एक होते. बांगलादेशची निर्मिती झाल्यानंतर ते बांगलादेशचे पहिले राष्ट्रपती आणि नंतर पंतप्रधानही बनले. राजकीय हेतूनच त्यांची आणि पत्नीसह दोन मुलांची हत्या झाली.

5. अवामी लीग पक्षाच्या सर्वेसर्वा बनल्यानंतर शेख हसीन मोठ्या ताकदीने बांगलादेशच्या राजकारणात सक्रीय झाल्या. बांगलादेशात लोकशाही नांदावी, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या बेधडक वृत्तीमुळे काही काळ त्यांना नजरकैदेतही ठेवण्यात आले.

6. शेख हसीना या पहिल्यांदा 1996 साली बांगलादेशच्या पंतप्रधान बनल्या. पहिला कार्यकाळ 2001 साली संपन्न झाला. पंतप्रधानपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पू्र्ण करणाऱ्या त्या बांगलादेशच्या पहिल्या पंतप्रधान ठरल्या.

7. महिला आणि लहान मुलांच्या हक्कांच्या त्या कडव्या समर्थक मानल्या जातात.

8. यूनेस्कोकडून देण्यात येणाऱ्या ‘यूनेस्को पिस ट्री’ या मानाच्या पुरस्काराने 2014 साली शेख हसीना याचा गौरव करण्यात आला. महिलांसाठी केलेल्या कामाचा विशेष उल्लेख या पुरस्कारादरम्यान करण्यात आला.

9. शेख हसीना या राजकीय क्षेत्राच्या पलिकडे जात, साहित्यातही रुची दाखवणाऱ्या नेत्या आहेत. त्यांनी आतापर्यंत 25 पुस्तके लिहिली आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *