45 वर्षांचा सीईओ 18 वर्षांचा दिसण्यासाठी दरवर्षी तब्बल एवढे पैसे खर्च करतो

चांगले फिट दिसण्यासाठी रोजचा व्यायाम करणारे अनेक जण आपण पाहिले असतील. त्यासाठी फिटनेस सेंटरवर घाम गाळणारे देखील आपण पहात असतो. परंतू एका कंपनीच्या सीईओने माणसाचे वय कमी दिसण्यासाठी ब्ल्यूप्रिंटच तयार केली आहे.

45 वर्षांचा सीईओ 18 वर्षांचा दिसण्यासाठी दरवर्षी तब्बल एवढे पैसे खर्च करतो
JHONSONUSAImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 1:37 PM

न्यूयॉर्क : फिट दिसण्यासाठी लोक काय काय करीत असतात. डायटींगवर जात असतात. कारण माणसाला आपण कधी म्हातारे होऊच नये असे वाटत असते. अमेरिकेच्या एका उद्योजकाने माणसाचे वय 5.1 वर्षांनी कमी करण्याचा प्रोजेक्ट ब्ल्यू प्रिंटवर काम सुरू केले आहे. हा सॉफ्टवेअर उद्योजक तरूण दिसण्यासाठी दरवर्षी 16 कोटी रूपये खर्च केल्याचा दावा केला आहे. त्याच्याकडे  30 पेक्षा जास्त डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांचा ताफा सुसज्ज आहे.

लोक तंदुरुस्त राहण्यासाठी ना ना प्रकारचे उपाय करीत असतात. तसेच ते आपली दिनश्चर्याही बदलत असतात. वाढत्या वयानुसार आपल्या शरीराची काळजी घेतात. तर काही जण तरुण दिसण्यासाठी कॉस्मेटीक सर्जरीचा पर्याय निवडतात, परंतु 45 वर्षांच्या एका सॉफ्टवेअर उद्योजकाने  18 वर्षांचा दिसण्याच्या धैय्याने प्रेरीत झाला असून हे उद्दीष्ठ गाठण्यासाठी  प्रयत्न सुरू केला आहे.

सॉफ्टवेअर उद्योजकाने एक महागडी ट्रीटमेंट घेणे सुरू केले असून त्याचा खर्च 20 लाख डॉलर प्रतिवर्ष आहे. त्याने आपला डायटरी प्लान आखला आहे. त्यांचे नाव ब्रायन जॉन्सन आहे. त्यांनी एका 18 वर्षीय व्यक्तीची फुप्फुसाची क्षमता आणि शारीरिक सहनशक्ती मिळवल्याचा दावा केला आहे. तसेच 37 वर्षीय व्यक्तीचे ह्दय आणि 28 वर्षांच्या व्यक्तीची त्वचा धारण केली आहे.

जॉन्सन हे एक अमेरिकेतील एक अल्ट्रावेल्थ सॉफ्टवेअर उद्योजक आहेत. ज्याच्याकडे 30 पेक्षा जास्त डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांचा ताफा सुसज्ज आहे. ही टीम त्यांच्या शरीरातील सर्व कार्याचे निरीक्षण करते. 29 वर्षीय डॉक्टर ऑलिव्हर झोलमन यांच्या नेतृत्वाखालील या टीमने जॉन्सन यांच्या सर्व अवयवांमधील वृद्धत्वाची प्रक्रिया उलट करण्याचा निर्धार केला आहे.

कॅलिफोर्नियातील KernelCo कंपनीचे सीईओ असलेल्या या उद्योजकाला 18 वर्षांच्या मुलासारखे शरीर हवे आहे आणि यावर्षी त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी 2 दशलक्ष डॉलर खर्च करण्याच्या मार्गावर आहे. प्रोजेक्ट ब्लूप्रिंट अंतर्गत, जॉन्सन दररोज काटेकोरपणे दिनचर्या पाळतात आणि शाकाहारी आहार घेतात. दररोज 1,977 कॅलरी घेतात, एक तास व्यायाम करतात आणि रोज रात्री नियमित वेळेत झोपतात. त्याची सकाळ पहाटे 5 वाजता होते. दोन डझन सप्लिमेंट्स आणि क्रिएटिन आणि कोलेजन पेप्टाइड्ससह ग्रीन ज्यूसने त्यांचा दिवस सुरू होतो.

झोलमन आणि जॉन्सन दीर्घायुष्यावरील सर्व वैज्ञानिक पुस्तके वाचून काढतात. त्यांचा ब्ल्यूप्रिंट प्रोजेक्टसाठी मोठ्या प्रमाणावरील गुंतवणूकीची गरज आहे. यात कॅलिफोर्नियातील व्हेनिस येथील जॉन्सनच्या घरातील वैद्यकीय सूटच्या खर्चाचाही समावेश आहे. यावर्षी जॉन्सन त्यांच्या शरीरावर किमान $2 दशलक्ष डॉलर (20 लाख डॉलर दशलक्ष) खर्च करण्याच्या तयारीत आहेत. त्यांना 18 वर्षांच्या मुलाचे मेंदू, हृदय, फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड, दात, त्वचा, केस, मूत्राशय, लिंग आणि गुदाशय हवे आहेत.

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.