काळी कार ठरली कर्दनकाळ, 5 निष्पाप चिमुरडे रस्त्यावरच ठार!

  • Sachin Patil
  • Published On - 12:54 PM, 24 Nov 2018

चीन: चीनमध्ये एका थरारक अपघाताने थरकाप उडाला आहे. भरधाव गाडीने चिमुकल्यांना अक्षऱश: चिरडलं. मन सुन्न करणारा हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा धक्कादायक प्रकार उत्तर चायनाच्या हुलुडानो इथं घडला.

रस्त्यावरुन गाड्या जात असतात, सिग्नल लाल होतो आणि मग गाड्या थांबतात हे चित्र आपण पाहतो. मात्र सिग्नल लागल्यानंतर गाड्या थांबल्या आणि शाळेची मुलं रस्ता ओलांडू लागली. जवळपास 50 ते 60 मुलं रस्ता ओलांडत होती. पण अचानक एक काळी कार समोरच्या रस्त्याने नो इंट्रीमधून भरधाव वेगात आली आणि या कारने काळ बनून चुमरड्यांचा घात केला.

या कारने मुलांना एवढ्या जोरात धडक दिला की 5 मुलांनी चक्क रस्त्यावरच प्राण सोडला. रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर कोसळली. काळीज थक्क होईल, मन सुन्न होईल, डोळे पाणावतील, संवेदना नष्ट होतील, असाच काहीसा हा प्रकार आहे.

मुलांना गाडीखाली चिरडून ही कार निघून गेली. ड्रायव्हरला ना कोणती संवेदना होती, ना कायद्याचा धाक. तो पळून गेला आणि रस्त्यावरचा हा भयंकर प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.

रस्त्यावरच मुलं मृत पावलीत. जी जखमी होती, ती रांगत रस्त्याच्या कडेला जाण्याचा प्रयत्न करत होती. या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली आणि त्यांनी हा परिसरात कॉर्डन ऑफ करून टाकला. पाच ते सहा वर्षांची ही मुलं, कोवळा जीव. पण त्यांऩा किती क्रूर पद्धतीने चिरडलं ते सीसीटीव्हीत कैद झालं. लहान मुलं त्यांच्याच साथिदारांना रस्त्यावर तडफडून मरताना पाहत होते आणि गर्दी व्हिडीओ तयार करत होती.

हा अपघात नाही, जाणिवपूर्वक केलेली हत्या आहे. जर ड्रायव्हरची चूक नव्हती, तर त्याने पळ का काढला, कारण मुलांना उडवल्यानंतर गाडीचा वेग मंदावला होता. पण ड्रायव्हर उतरला नाही, त्याने निर्दयीपणे पळ काढला. त्याच्या या खूनशी ड्रायव्हिंगमुळे पाच चिमुरडयांचा हकनाक बळी गेला. तर 18 मुलं गंभीर जखमी झाली आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याला तुरुंगात धाडलंय…पण हा धक्कादायक प्रकार पाहून काळीज पिळवटून निघालं.

गिरीश गायकवाड, टीवी 9 मराठी, मुंबई. 

VIDEO: (अपघाताची दृश्ये विचलित करु शकतात)