पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf death penalty) यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Pervez Musharraf death penalty, पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा

नवी दिल्ली/इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf death penalty) यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानातील विशेष कोर्टाने माजी लष्करप्रमुख आणि माजी राष्ट्रपती असलेल्या परवेझ मुशर्रफ ((Pervez Musharraf death penalty)) यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. परवेझ मुशर्रफ यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप आहे.  न्यायमूर्ती वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील 3 सदस्यीय खंडपीठाने 2-1 ने निर्णय देताना, मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली.

मुशर्रफ यांच्याविरोधातील राष्ट्रद्रोहाचा हा खटला 2013 पासून रखडला होता. मुशर्रफ हे सध्या दुबईत आहेत. 2016 मध्ये ते पाकिस्तानातून दुबईला पळून गेल्याचा आरोप आहे. त्यामुळे ही सुनावणी रखडली होती. पाकिस्तानात परतण्याच्या अटीवर मुशर्रफ हे उपचाराचं कारण देऊन पाकिस्तानातून दुबईला गेले होते. मात्र तेव्हापासून ते पाकिस्तानात परतलेच नाहीत. त्यामुळे पाकिस्तानातील न्यायालयाने त्यांना फरार घोषित केलं होतं. आज कोर्टाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.

मुशर्रफ सध्या संयुक्त अरब अमिरातीतील दुबई इथे राहात आहेत. मुशर्रफ यांच्याविरोधातील राष्ट्रद्रोहाचा हा खटला 2013 पासून रखडला होता. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजच्या (पीएमएल-एन) मागील सरकारने 2013 मध्ये मुशर्रफ यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल केला होता. मुशर्रफ यांच्यावर 3 नोव्हेंबर 2007 रोजी आणीबाणी लागू केल्याचाही आरोप आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

परवेझ मुशर्रफ हे राष्ट्रपती असताना त्यांनी पाकिस्तानात 3 नोव्हेंबर 2007 रोजी आणीबाणी लागू केली होती. पाकिस्तानात 2013 मधील निवडणुकांमध्ये विजय मिळवून पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज़) सरकार सत्तेत आलं. सत्तेत आल्यानंतर सरकारने सर्वात आधी परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल केला. याप्रकरणी डिसेंबर 2013 मध्ये त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल झाला. इस्लामाबादच्या विशेष न्यायालयाने परवेझ मुशर्रफ यांना 31 मार्च 2014 रोजी देशद्रोहाच्या खटल्यात आरोपी केलं होतं.

पाकिस्तानाच्या इतिहासात मुशर्रफ हे पहिले नागरिक होते, ज्यांच्याविरोधात संविधानाच्या अवहेलनेचा खटला चालला. मुशर्रफ यांच्याविरोधात 31 मार्च 2014 रोजी आरोप ठेवले गेले होते आणि त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांच्याविरोधात सर्व पुरावे विशेष न्यायालयासमोर ठेवले होते.

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान मुशर्रफ दुबईला गेले ते परत आलेच नाहीत. त्यामुळे कोर्टाने त्यांना फरार घोषित केलं.या खटल्यातील सुनावणीदरम्यान परवेझ मुशर्रफ हे केवळ एकदाच विशेष न्यायालयात हजर राहिले. त्यानंतर ते कधीही कोर्टात आले नाहीत. त्याचदरम्यान 2016 मध्ये प्रकृतीचं कारण देत, मुशर्रफ दुबईला गेले. त्यावेळी त्यांना पाकिस्तानात परतण्याच्या अटीवर देश सोडण्याची परवानगी दिली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *