आज ऑर्डर केल्यानंतर 30 वर्षांनी खायला मिळेल ‘ही’ डिश, असं काय आहे विशेष?

हे जपानी कुटुंब गेल्या 96 वर्षांपासून त्यांच्या दुकानातून हा मांसाहारी पदार्थ विकत आहे.

आज ऑर्डर केल्यानंतर 30 वर्षांनी खायला मिळेल 'ही' डिश, असं काय आहे विशेष?
Japanese Non veg DishImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 17, 2022 | 5:04 PM

मुंबई,  जपानची एक खास नॉनव्हेज डिश (Japanese Non veg Dish) इतकी लोकप्रिय आहे की ती आज ऑर्डर केली तर ती 30 वर्षांनंतर मिळेल. या डिशला प्रचंड मागणी आहे. हे बटाट्याच्या विशिष्ट जाती आणि मांस मिसळून बनवले जाते. या मांसाहारी पदार्थाचे नाव क्रोकेट्स आहे. जे जपानच्या ‘आशिया’ कुटुंबाने बनवले आहे. हा एक प्रकारचा स्नॅक्स आहे. जपानमध्ये बनवलेली ही क्रोकेट्स डिश जगभर प्रसिद्ध आहे. अहवालानुसार, हे जपानी कुटुंब गेल्या 96 वर्षांपासून त्यांच्या दुकानातून हा मांसाहारी पदार्थ विकत आहे. 1999 मध्ये आशियाने तिचे पहिले ऑनलाइन स्टोअर उघडले आणि तिची उत्पादने विकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला या नॉनव्हेज डिशसाठी लोक पैसे खर्च करतील, अशी अपेक्षा आशिया कुटुंबाला नव्हती.

पिढीजात व्यवसाय

शिगेरू निट्टा हे ‘आशिया’ कुटुंबातील तिसर्‍या पिढीतील सदस्य आहेत, जे त्याचा पिढीजात व्यवसाय सांभाळत आहेत  सांभाळत आहेत. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, एक्स्ट्रीम क्रोकेट्सचा एक तुकडा  200 रुपये प्रति नग या दराने विकला जातो.

शिगेरू म्हणाले की ते कमी खर्चात चविष्ट क्रोकेट्स बनवण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे या पदार्थाची मागणी मोठ्या प्रमाणात होत असते.

हे सुद्धा वाचा

30 वर्षांचा प्रतीक्षा कालावधी

2016 मध्ये, शिगेरूने प्रतीक्षा यादीत म्हणजेच वेटिंग लिस्टमध्ये लोकांना जोडणे बंद केले, कारण तेव्हा डिलिव्हरीचा कालावधी  14 वर्षांपेक्षा जास्त झाला होता. 2017 मध्ये ‘आशिया’ पुन्हा एकदा उघडला, पण त्यानंतर या विशेष डिशची किंमत वाढवण्यात आली.

शिगेरू म्हणतात की, दर आठवड्याला 1400 क्रोकेट्सचे तुकडे बनविले जातात. त्यामुळे आज जर एखाद्याने त्यासाठी ऑर्डर दिली तर त्याला त्याच्या वितरणासाठी किमान 30 वर्षे वाट पाहावी लागेल.

एका ग्राहकाने सांगितलं अनुभव!

या वर्षाच्या सुरुवातीला, एक जपानी महिला आणि ट्विटर वापरकर्ता @hayasino ने सांगितले की तिला 9 वर्षांनंतर क्रोकेट्सची डिलिव्हरी मिळाली. या महिलेने 8 सप्टेंबर 2013 रोजी डिश डिलिव्हरीची ऑर्डर दिल्याचा दावा केला होता.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.