Angela Ahrendts अॅपल कंपनीतील 1.73 अब्ज पगाराची नोकरी सोडणार, कारण...

मुंबई : अॅपलच्या आयफोन विक्रीत गेले काही दिवस घट होत आहे. यामुळे कंपनीमध्ये सर्वात जास्त पगार असणारे अधिकारी कंपनी सोडून जात आहेत. विशेष म्हणजे जास्त पगार असणाऱ्या अधिकाऱ्यांमधील रिटेल प्रमुख अँजेला अँरेंट्सही (angela ahrendts) आता Apple कंपनी सोडणार आहे. अँजेला एप्रिल महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे. अँजेला 2014 मध्ये अॅपल कंपनीत जॉईन झाली होती. तिचा …

Angela Ahrendts अॅपल कंपनीतील 1.73 अब्ज पगाराची नोकरी सोडणार, कारण...

मुंबई : अॅपलच्या आयफोन विक्रीत गेले काही दिवस घट होत आहे. यामुळे कंपनीमध्ये सर्वात जास्त पगार असणारे अधिकारी कंपनी सोडून जात आहेत. विशेष म्हणजे जास्त पगार असणाऱ्या अधिकाऱ्यांमधील रिटेल प्रमुख अँजेला अँरेंट्सही (angela ahrendts) आता Apple कंपनी सोडणार आहे. अँजेला एप्रिल महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे.

अँजेला 2014 मध्ये अॅपल कंपनीत जॉईन झाली होती. तिचा पगार अंदाजे 1.73 अब्ज रुपये होता. अँजेला अँरेंट्स नोकरी का सोडत आहे? हे कारण अजून स्पष्ट नाही. मात्र अँजेलाच्या जागेवर आता कंपनीने उपाध्यक्ष डिरड्रे ओ ब्रायनची नियुक्ती केली आहे. ब्रायन गेले तीस वर्ष कंपनीमध्ये काम करत आहे. अँजेला 2015 च्या फोर्ब्सच्या यादीत जगातील सर्वात शक्तीशाली महिला म्हणून 25 व्या स्थानावर होती.

आयफोनच्या विक्रीत 15 टक्क्यांनी घट

अॅपलने आर्थिक वर्ष 2019च्या पहिल्या तीन महिन्यामध्ये 84.3 अब्ज डॉलर रुपयांची विक्री केली. ही विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेने 5 टक्क्यांनी कमी आहे. आयफोनला मिळालेल्या नफ्यांमध्ये 15 टक्क्यांची घट झाली आहे. मिळालेल्या नफ्यामध्ये आंतरराष्ट्रीय विक्रीचे योगदान 62 टक्के आहे. यावेळी पहिल्यांदाच कंपनीने विक्रीबद्दलची माहिती दिलेली नाही.

आयफोन उत्पादनात 10 टक्क्यांची घट

आयफोनच्या जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या उत्पादनात 10 टक्क्यांची घट झाली आहे. तसेच अॅपलने आपलं उत्पादन कमी करण्यास सांगितले आहे. गेल्या दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे. आयफोनने डिव्हाईसच्या नियोजित उत्पादनातही घट केली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *