आश्चर्य..! ऑस्ट्रेलियामध्ये 22 पुरुषांनी बाळांना जन्म दिला

ऑस्ट्रेलियामध्ये 22 पुरुषांनी बाळांना जन्म दिला आहे. बाळांना जन्म देण्यासोबतच त्यांनी मातृत्वाचा अनुभव घेतला, जो आजवर फक्त महिलांच्या नशिबात होता.

Australia 22 men gave birth, आश्चर्य..! ऑस्ट्रेलियामध्ये 22 पुरुषांनी बाळांना जन्म दिला

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियामध्ये 22 पुरुषांनी बाळांना जन्म दिला आहे. बाळांना जन्म देण्यासोबतच त्यांनी मातृत्वाचा अनुभव घेतला, जो आजवर फक्त महिलांच्या नशिबात होता. ऑस्ट्रेलियाच्या 2018 ते 2019 च्या जनगणनेतील आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, ‘डिपार्टमेंट ऑफ ह्यूमन सर्व्हिस’ने जन्म दराची माहिती प्रदर्शित केली. यामध्ये मुलांना जन्म देणाऱ्यांमध्ये 22 पुरुषांचा समावेश होता. या पुरुषांनी बाळांना जन्म देण्यापूर्वी लिंग बदलले होते.

ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत 228 पुरुषांनी बाळांना जन्म दिला आहे. या यादीत आता या 22 पुरुषांच्या नावाचाही समावेश होणार आहे. बाळाला जन्म देण्यासाठी या पुरुषांनी त्यांचं लिंग बदलले होते. ऑस्ट्रेलियात यावर आक्षेपही घेण्यात आला होती. इथल्या काही लोकांनी बाळांना जन्म दिल्यानंतर आई बनलेल्या पुरुषांच्या पुरुषत्वावरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. त्यांच्या मते, जर कोणत्या पुरुषाने बाळाला जन्म दिला, तर तो पुरुष नाही. दरम्यान, पुरुषांच्या पुरुषत्वावर प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं, असं मेलबर्न युनिव्हर्सिटीतील एका प्राध्यापकांनी सांगितले.

ज्या पुरुषांनी बाळांना जन्म दिला, त्या पुरुषांनी लिंग बदलासाठी शस्त्रक्रिया केली असावी, अशी शक्यता प्राध्यापकांनी वर्तवली. कदाचित त्यांचा दृष्टीकोन इतरांपेक्षा वेगळा असेल. कदाचित ते इतरांसारखा विचार करत नसतील, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. तसेच, जर बाळ स्वस्थ असेल, तर यात समस्या काय आहे? यावरुन एखाद्याच्या पुरुषत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे आहे. त्याउलट आता समाजाने लैगिंकतेबाबत आपला दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे, असं मत प्राध्यापकांनी दिलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *