बँकॉकमधील थरारक स्कायवॉकचा व्हिडीओ एकदा पाहाच!

थायलंड: बँकॉक हे शहर तिथल्या नाईट लाईफसाठी खूप प्रसिद्ध आहे. तिथल्या नाईटलाईफची जादू काही औरच असते. रोशनाईने सजलेले रस्ते, मोठ-मोठ्या इमारती, सुंदर समुद्रकिनारे आणि बरंच काही. बँकॉकमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पर्यटकांना आपल्याकडे आकर्षूण घेतात. तिथली झगमगती लाईफ, ट्रॅडिशनल थाई मसाज, शॉपिंग मॉल, स्ट्रीट फूड, मंदिरं वगैरे पर्यंटकांचं लक्ष वेधून घेतात. रात्री पाण्यातून प्रवास करताना […]

बँकॉकमधील थरारक स्कायवॉकचा व्हिडीओ एकदा पाहाच!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

थायलंड: बँकॉक हे शहर तिथल्या नाईट लाईफसाठी खूप प्रसिद्ध आहे. तिथल्या नाईटलाईफची जादू काही औरच असते. रोशनाईने सजलेले रस्ते, मोठ-मोठ्या इमारती, सुंदर समुद्रकिनारे आणि बरंच काही. बँकॉकमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पर्यटकांना आपल्याकडे आकर्षूण घेतात. तिथली झगमगती लाईफ, ट्रॅडिशनल थाई मसाज, शॉपिंग मॉल, स्ट्रीट फूड, मंदिरं वगैरे पर्यंटकांचं लक्ष वेधून घेतात. रात्री पाण्यातून प्रवास करताना या शहराला बघणे डोळ्यांचे पारणे फेडणारं ठरतं. त्यामुळे जास्तीत जास्त  पर्यटकांचा कल हा बँकॉककडे असतो. परदेशी ट्रीपला जायचं म्हटलं की, अनेकांची पहिली पसंती ही बँकॉक असते. म्हणूनच की काय बँकॉक हे शहर जगभरातील पर्यटकांकडून सर्वात जास्त भेट दिलं जाणारं शहर आहे. इथे दरवर्षी  दीड कोटी लोक फिरायला येतात.

आता बँकॉकच्या या पर्यटन यादीत आणखी एक ठिकाण जोडले गेले आहे, ते म्हणजे इथला पारदर्शी स्कायवॉक. या स्कायवॉकला महानखा ग्लास स्काय वॉक ( Mahanakhon Glass SkyWalk.) असं नाव दिलं आहे.

तुम्ही चीनच्या स्कायवॉकबाबत ऐकले असेलचं. बँकॉकचा हा स्कायवॉकही तसाचं आहे. हा स्कायवॉक चीन इतका भयानक नसला, तरी तुम्हाला यावर उभं राहिल्यावर अंतराळी असल्याचा अनुभव नक्की येईल.

हा स्काय वॉक थायलंडची सर्वात ऊंच इमारत असलेल्या किंग पॉवर महानखां इथे बनवण्यात आलं आहे. ही इमारत 1,030 फूट इतकी उंच आहे. या स्काय वॉकवरून संपूर्ण बँकॉक बघायला मिळतं. तसेच तुम्ही यावर उभं राहून एक थरारक आणि आश्चर्यचकीत करणारा अनुभव घेऊ शकता.

हा ग्लास स्कायवॉक बँकॉकमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.

पाहा VIDEO :

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.