किस करणाऱ्या जोडप्याचा फोटो फेसबुकवर टाकला, खासदाराला शिव्यांची लाखोली

शाळेच्या पार्कमध्ये एक अल्पवयीन जोडपं किस करताना या खासदाराने पाहिलं आणि त्यांचा फोटो काढून तो फेसबुकवर शेअर करण्यात आला. शिवाय त्या ठिकाणी खासदाराने पोलिसांनाही पाचारण केलं. या प्रकाराचा सोशल मीडियावर चांगलाच समाचार घेण्यात आला.

किस करणाऱ्या जोडप्याचा फोटो फेसबुकवर टाकला, खासदाराला शिव्यांची लाखोली
Follow us
| Updated on: Jul 18, 2019 | 6:16 PM

ढाका : मॉरल पोलिसिंग करणं बांगलादेशमधील एका खासदाराला चांगलंच महागात पडलं. शाळेच्या पार्कमध्ये एक अल्पवयीन जोडपं किस करताना या खासदाराने पाहिलं आणि त्यांचा फोटो काढून तो फेसबुकवर शेअर करण्यात आला. शिवाय त्या ठिकाणी खासदाराने पोलिसांनाही पाचारण केलं. या प्रकाराचा सोशल मीडियावर चांगलाच समाचार घेण्यात आला आणि युझर्सने खासदाराला तत्वही शिकवले.

एकरामुल करीम चौधरी असं या बांगलादेशच्या खासदाराचं नाव आहे. ते दक्षिण नाओखली जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात. किस करताना काढलेला फोटो त्यांनी फेसबुकवर टाकला होता. विशेष म्हणजे हे जोडपं अल्पवयीन होतं. या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या, ज्यात या खासदारावर मोठ्या प्रमाणात टीका करत निषेधही व्यक्त करण्यात आला होता.

पार्कमध्ये फिरत असलेल्या लोकांची पोलिसिंग करणं ही खासदाराची जबाबदारी नसते, असंही काहींनी सांगितलं. या टीकेनंतर करीम चौधरी यांनी पोस्ट डिलीट केली आणि आपल्याला सोशल मीडियाबाबत फार माहिती नसल्याचा दाखला दिला. हा फोटो टाकण्यापूर्वी जोडप्याचा चेहरा लपवायला हवा होता, असंही ते म्हणाले.

एएफपीशी बातचीत करताना ते म्हणाले, मी पार्कमधून जात असताना तिथे अनेक जण किस करताना दिसले. माझ्या मतदारसंघात या प्रकारची अश्लीलता मी खपवून घेणार नाही, असं ते म्हणाले. मी जे केलं ते अगदी योग्य होतं, असं म्हणत त्यांनी स्वतःचा बचावही केला. मी टीकेचं स्वागत करतो, पण माझं हे काम पुढेही सुरुच राहिल, असं ते म्हणाले.

दरम्यान, स्थानिक पोलिसांनी या जोडप्यांना समज देऊन पालकांच्या ताब्यात दिलं. शाळा सोडून पार्कमध्ये फिरणं चुकीचं असल्याचं या जोडप्यांना समजावून सांगितल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. बांगलादेशमधील ही घटना आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय बनली. कारण, या मुस्लीमबहुल देशात आजही सार्वजनिक ठिकाणी किस करणं अश्लीलता समजली जाते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.