kobe bryant : अमेरिकेत हेलिकॉप्टर अपघात, प्रसिद्ध बास्केटबॉलपटूसह 13 वर्षीय मुलीचाही मृत्यू

बास्केटबॉल जगतातील महान खेळाडू अशी ओळख असलेल्या कोबी ब्रायंट याचा एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला (kobe bryant died) आहे.

kobe bryant died, kobe bryant : अमेरिकेत हेलिकॉप्टर अपघात, प्रसिद्ध बास्केटबॉलपटूसह 13 वर्षीय मुलीचाही मृत्यू

कॅलिफोर्निया : बास्केटबॉल जगतातील महान खेळाडू अशी ओळख असलेल्या कोबी ब्रायंट याचा एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला (kobe bryant died) आहे. तो 41 वर्षांचा होता. अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरात झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. कोबी ब्रायंट हे आपल्या मुलीसोबत आणि कर्मचाऱ्यांसोबत खासगी हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. या दुर्घटनेत कोबी ब्रायंट यांच्या मुलीसह सर्वांचा मृत्यू झाला आहे. ब्रायंट याच्या मृत्यूमुळे बास्केटबॉल जगतावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता हा अपघात झाला. लॉस एंजेलिस टाईम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेल्या ठिकाणी दाटं धुकं पसरलं होतं. त्यामुळे बचाव पथकाला बचाव कार्यादरम्यान अडथळ्यांचा सामना करावा लागला. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील चार लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.

लॉस एंजिल्सच्या सुरक्षा विभागातील अधिकारी टोनी इमब्रेंडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 10 च्या सुमारास आम्हाला मालिबू क्षेत्रातून एका विमान दुर्घटनेची माहिती मिळाली. लॉस वेगेन्सच्या कैलाबासमधून हे ठिकाणी दूर आहे. त्या ठिकाणचे काही स्थानिक लोक माऊंटेन बाइकिंग करत होते. त्यावेळी त्यांना हे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचे आढळले. ते थोडंसं जवळ गेल्यानंतर त्या स्थानिक लोकांना ते हेलिकॉप्टर असल्याचे जाणवलं. दुर्घटनाग्रस्त झालेले हेलिकॉप्टर हे एक एस 76 सिकोरस्की प्रकाराचे होते.

कोबी ब्रायंटने आपल्या 20 वर्षाच्या करिअरमध्ये अनेक रेकॉर्ड आपल्या नावे नोंद केले आहे. ब्रायंट हा नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमधून बास्केटबॉल खेळायचा. त्याने 5 चॅम्पियनशिप जिंकल्या होत्या. तब्बल 18 वेळा तो ‘एनबीए ऑल स्टार’ ठरला होता. ब्रायंटने 2008 आणि 2012 ऑलंपिक गेममध्ये यूएसए टीम साठी दोन सुवर्णपदकाचीही कमाई केली होती.

गार्जियन टाइम्स की रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, बास्केटबॉलमधील निवृत्ती घेतल्यानंतर त्याने सिनेक्षेत्रात पाऊल ठेवले. 2018 मध्ये त्याने ‘डियर बास्केटबॉल’ नावाची एक शॉर्ट फिल्म बनवली होती. ही शॉर्ट फिल्मला ऑस्कर पुरस्कारही मिळाला होता.

कोबी ब्रायंट अनेकदा हेलिकॉप्टरनेच प्रवास करायचा. त्याच्या अपघाती निधनामुळं बास्केटबॉल प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, बराक ओबामा यांसह बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनीही या घटनेवर शोक (kobe bryant died) व्यक्त केला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *