VIDEO : पाकचं अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अजब पाऊल, बेली डान्सचं आयोजन

दिवसेंदिवस पाकिस्तानची अर्थव्यवस्था ढासळत आहे. ही अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी पाकिस्तानकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. त्याशिवाय इतर देशांचीही मदत घेत आहेत.

VIDEO : पाकचं अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अजब पाऊल, बेली डान्सचं आयोजन

इस्लामाबाद : दिवसेंदिवस पाकिस्तानची अर्थव्यवस्था (Pakistan Economy) ढासळत आहे. ही अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी पाकिस्तान सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. नुकतेच पाकिस्तानने अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी चक्क बेली डान्सचं (Belly Dance) आयोजन केले होते. त्यामुळे पाकिस्तानी जनतेने सरकारवर जोरदार टीका केली. परदेशी गुंतवणूकदारांना (Investors) आकर्षित करण्यासाठी या बेली डान्सचे आयोजन केले होते.

पाकिस्तानच्या सरहद चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीद्वारे 4 ते 8 सप्टेंबरपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी बेली डान्सचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यामध्ये वेगवेगळे बेली डान्स करण्यात आले. बेली डान्सचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहे. ज्यामध्ये महिला डान्स करताना दिसत आहेत.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अनेकजण कमेंट करत आहे. काहींनी तर पाकिस्तान सरकारवर जोरदार टीका केली, तर काहींनी याचे समर्थन केलेलं दिसत आहे.

पाकिस्तानच्या काही स्थानिक मीडिया वेबसाईट आणि ट्विटरवरील मंडळींनी या प्रकरणाला ‘नवीन पाकिस्तान’ असं नाव दिलं आहे. एका युजर्सने ट्वीट करत म्हटलं की, “पाकिस्तान आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी बेली डान्सची मदत घेत आहे, यानंतर काय होणार?

“पाकिस्तानची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अतुल्य कार्यक्रम, जर अर्थव्यवस्था यापेक्षाही खाली घसरली, तर निर्वस्त्र डान्स आयोजित करणार का?” असा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे.

“एकिकडे भारत चंद्रयान 2 लाँच करत आहे. तर पाकिस्तान गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी बेली डान्स आयोजित करत आहे”, असंही एका युजर्सने म्हटलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *