अमेरिकेत पावसाचा कहर, व्हाईट हाऊसमध्ये पाणी शिरले

अमेरिकेची राजधानी वॉशिग्टंनमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी (6 जुलै) सकाळपासून जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे मोठा फटका येथील रहिवाशांना बसला आहे.

अमेरिकेत पावसाचा कहर, व्हाईट हाऊसमध्ये पाणी शिरले

वॉशिग्टंन : अमेरिकेची राजधानी वॉशिग्टंनमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी (6 जुलै) सकाळपासून जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे मोठा फटका येथील रहिवाशांना बसला आहे. शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने लोक स्वत:चा बचाव करण्यासाठी गाडीच्या छतावर बसले आहेत. या घटनेचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सतत सुरु असलेल्या पावसामुळे वॉशिग्टंनमधील नॉर्थ वेस्टर्न डीसी, साऊथर्न मोंटगोमेरी, ईस्ट सेंट्रल लॅडोन काऊंटी, अर्लिंगटन काऊंटी, फाल्स चर्च आणि नॉर्थ ईस्टर्न फेअरफेक्स काऊंटी विभागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. हवामान विभागानेही घराबाहेर न पडण्याचे आवाहन येथील नागरिकांना केलं आहे.

जोरदार पावसाने शहरातील रस्त्यावर नदीचे स्वरुप आले असून याचा परिणाम वाहतुकीवर पडला आहे. पाणी साचल्याने ट्रेनही उशिराने धावत आहेत. या पावसाचा फटका राष्ट्रपतीच्या निवासस्थानालाही बसला. राष्ट्रपतींचे निवासस्थान व्हाईट हाऊसमध्येही पावसाचे पाणी शिरल्याने तेथील अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडालेली आहे.

वॉशिग्टंन शहराची ही परिस्थिती तेथील पोटोमॅक नदीमुळे झाली. येथील कॅनल रोडजवळ मोठ्या प्रमाणात पूर आला आहे.

मंगळवारी आणि बुधवारी पाऊस थांबण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण गुरुवारी मोठे वादळ येऊ शकते, असंही सांगण्यात आलं आहे. त्यानंतर सर्व परिस्थिती व्यवस्थित होईल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *