उद्योगपती नेस वाडियांना जपानमध्ये 2 वर्षांची जेल

टोकियो (जपान) : वाडिया ग्रुपचे मालक नेस वाडिया यांना जपानमध्ये दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अंमली पदार्थ (ड्रग्) बाळगल्याचा आरोप नेस वाडिया यांच्यावर आहे. ‘द फायनाशियल टाईम्स’ या वृत्तपत्राने नेस वाडियांबाबतच्या या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नेस वाडिया यांना 20 मार्च 2019 च्या आधीच जपानमधील होक्काइडो आयलँडमधील विमानतळावर अटक करण्यात आली होती. मात्र, जामिनावर बाहेर …

Businessman Ness Wadia, उद्योगपती नेस वाडियांना जपानमध्ये 2 वर्षांची जेल

टोकियो (जपान) : वाडिया ग्रुपचे मालक नेस वाडिया यांना जपानमध्ये दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अंमली पदार्थ (ड्रग्) बाळगल्याचा आरोप नेस वाडिया यांच्यावर आहे. ‘द फायनाशियल टाईम्स’ या वृत्तपत्राने नेस वाडियांबाबतच्या या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

नेस वाडिया यांना 20 मार्च 2019 च्या आधीच जपानमधील होक्काइडो आयलँडमधील विमानतळावर अटक करण्यात आली होती. मात्र, जामिनावर बाहेर येऊन, ते भारतात परतले होते. वैयक्तिक वापरासाठी ड्रग्ज बाळगल्याची नेस वाडिया यांनी कबुली दिली होती. नेस वाडिया यांच्याकडे 25 ग्रॅम ड्रग्ज सापडलं.

2020 साली जपानमधील टोकियोत ऑलिम्पिक, तर यंदा म्हणजे 2019 साली रग्बी वर्ल्ड कप आयोजित करण्यात आले आहे. या महत्त्वाच्या स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर जपानमध्ये अंमली पदार्थांबाबतचे धोरण अत्यंत कठोर करण्यात आले असून, कायद्याची काटेकोरपणे अंमलबाजवणी केली जात आहे.

कोण आहेत नेस वाडिया?

नेस वाडिया हे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. उद्योगपती नुस्ली वाडिया यांचे ते सुपुत्र आहेत. नेस वाडिया हे वाडिया ग्रुपचे एकमेव वारसदार आहेत. आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबचे ते सह-मालक सुद्धा आहेत. ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि गो एअर या कंपन्याही वाडिया ग्रुपच्या मालकीच्या आहेत. जवळपास 91 हजार 700 कोटी रुपयांच्या वाडिया ग्रुपच्या कंपन्या आहेत.

नेस वाडिया हे याआधीही वादात अडकले होते. 2014 साली बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिने नेस वाडिया यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. त्यानंतर काही काळाने प्रीती झिंटानेच तक्रार मागे घेतली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *