तिबेटमध्ये चिनी सैनिकांकडून मिलिट्री लॉजिस्टिक हबची निर्मिती, सॅटेलाईट फोटोंतून उघड

चीन तिबेट स्वायत्त प्रदेशात विकासाशी संबंधित उपक्रम राबवत आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:38 PM, 11 Jan 2021
Chinese Army

बीजिंगः नुकत्याच झालेल्या सॅटेलाईट फोटोंनुसार चीन तिबेटच्या जिग्त्से येथे सैन्य लॉजिस्टिक हब तयार करीत आहे. तज्ज्ञांना असा विश्वास आहे की, LAC वरील कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी चीन अशी पावले उचलत आहे. भारताचे संरक्षण प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी असा दावा केला होता की, चीन तिबेट स्वायत्त प्रदेशात विकासाशी संबंधित उपक्रम राबवत आहेत. (Chinese Army Is Building Military Logistic Hub In Tibet)

पीएलएकडून लॉजिस्टिक हब बनविण्याचा दावा करणारे फोटो सोमवारी @dresresfa नावाच्या ट्विटर हँडलद्वारे शेअर करण्यात आले आहेत. जिग्त्से विमानतळाच्या दक्षिणेस पीएलएने बांधलेले लॉजिस्टिक हब रेल्वे टर्मिनलशी जोडलेले असल्याचा दावा या छायाचित्रांमधून करण्यात आला आहे. तत्पूर्वी संरक्षण प्रमुख जनरल बिपीन रावत यांनीही तिबेटमध्ये चीनच्या निर्मितीचा दावा केला होता. त्यांनी डिसेंबरमध्ये म्हटले होते की, LAC वरून भारत-चीन सीमा तणावादरम्यान, चीन तिबेट स्वायत्त प्रदेशात इमारत बांधून विकासकामे करीत आहे.

अमेरिकन नौदलाच्या शस्त्रास्त्रांमधील 127 मीडियम कॅलिबर बंदुका भारताला देणार

अमेरिकेने भारतासोबत केलेल्या 3800 कोटींच्या कराराअंतर्गत या बंदुका देण्यात येणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत नेहमी अमेरिकेशी आपले सैन्य संबंध मजबूत करत आहे. हल्लीच भारताने अमेरिकेकडून दोन ड्रोनही लीजवर घेतले आहेत. या बंदुकांना समुद्रात तैनात केलेल्या युद्धनौकांवर पाठवण्यात येणार आहे. यासंबंधी भारताने अमेरिकन सरकारला निवेदन पत्रही पाठवले होतं. या पत्राद्वारे भारताने 127 मीडियम कॅलिबर गनची मागणी केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पत्राची दखल घेत अमेरिका त्यांची काही शस्त्रं भारतीय नौदलाकडे सोपवणार आहेत. जेणेकरून शस्त्रे लवकरात लवकर भारतीय युद्धनौकांवर पाठवता येतील.

संबंधित बातम्या

चीनला अद्दल घडवण्यासाठी अमेरिकेची भारताला साथ, नौदलाला देणार शक्तिशाली बंदुका

Chinese Army Is Building Military Logistic Hub In Tibet