Corona Virus : महिलेने खोकत सांगितले वुहानवरुन आले, बलात्कार करण्यास आलेला तरुण भीतीने पळाला

चीनमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. हीच भीती दाखवत एका महिलेने बलात्कार होण्यापासून स्वत:चा बचाव केला

Chinese woman saved herself from rapist by corona virus, Corona Virus : महिलेने खोकत सांगितले वुहानवरुन आले, बलात्कार करण्यास आलेला तरुण भीतीने पळाला

बीजिंग : चीनमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. हीच भीती दाखवत एका महिलेने बलात्कार होण्यापासून स्वत:चा बचाव केला (Chinese woman saved herself from rapist by corona virus) आहे.  महिलेने बलात्कार करायला आलेल्या तरुणाला मी आताच वुहानवरुन आले आहे, असं खोकत सांगितलं. हे ऐकून बलात्कार करण्यास आलेला तरुण घाबरुन पळून (Chinese woman saved herself from rapist by corona virus) गेला.

वुहानच्या जिंगशॅन इथे हा प्रकार घडला. 25 वर्षाचा आरोपी जायो शुक्रवारी (31 जानेवारी) यी नावाच्या महिलेच्या बेडरुममध्ये घुसला. त्याने महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा महिलेने स्वत: आजारी असल्याचे दाखवत “मी आताच वुहानवरुन आले आहे. मला कोरोना इन्फेक्शन झाले आहे, त्यामुळे मला घरात एकटीला ठेवले आहे”, असं आरोपीला सांगितलं.

“आरोपी जायोने त्या रात्री आपले घर सोडले होते आणि त्याच्याजवळ पैसे नव्हते. त्यामुळे तो घरात चोरीच्या उद्देशाने घुसला. त्याने यी ला एकटीला पाहून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र यी ने कोरोनाची भीती दाखवल्यानंतर तो पळून गेला. मग यीने तातडीने पोलिसांना फोन करुन या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. मात्र त्यांना जायोचा शोध घेण्यास अडचण येत होती. कारण सर्वांनी तोंडाला मास्क लावले आहे. पण अनेक अडचणीनंतर आरोपीला अटक केली आहे”, अशी माहिती पोलिसांनी दिली.

महिलेने कोरोनाची भीती दाखवून आरोपीला पळवून लावलं. कोरोना व्हायरसची धास्ती किती आहे, यावारुन अधोरेखित होतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *