लैंगिक शोषणाच्या आरोपावर ट्रम्प म्हणाले, "ती माझ्या टाईपची नाही"

'मी लैंगिक शोषण केलं नव्हतं, कारण ती माझ्या टाईपची नाही.' 90 च्या दशकाच्या मध्यात ट्रम्प यांनी एका कपड्याच्या दुकानातील ड्रेसिंग रुममध्ये आपलं लैंगिक शोषण केलं होतं, असा आरोप लेखिका ई जीन कॅरोल यांनी केला होता.

writer e-jean carroll, लैंगिक शोषणाच्या आरोपावर ट्रम्प म्हणाले, “ती माझ्या टाईपची नाही”

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कारकीर्द जेवढी गाजत आहे, तेवढंच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत असतं. एका नव्या प्रकारामुळे ते आता चर्चेत आहेत. त्यांच्यावर एका लेखिकेने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते, ज्याला उत्तर देताना ते म्हणाले की, ‘मी लैंगिक शोषण केलं नव्हतं, कारण ती माझ्या टाईपची नाही.’ 90 च्या दशकाच्या मध्यात ट्रम्प यांनी एका कपड्याच्या दुकानातील ड्रेसिंग रुममध्ये आपलं लैंगिक शोषण केलं होतं, असा आरोप लेखिका ई जीन कॅरोल यांनी केला होता.

एका मुलाखतीत बोलताना ट्रम्प यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले. “पहिली गोष्ट म्हणजे ती माझ्या टाईपची नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं कधीही झालं नव्हतं. कॅरोल पूर्णपणे खोटं बोलत आहे. मला तिच्याबद्दल काहीही माहिती नाही. कुणी अशा पद्धतीने वक्तव्य करणं हे भीतीवह आहे. मला याबाबत काहीही माहित नाही,” असं ट्रम्प म्हणाले.

यापूर्वी कॅरोल यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. ट्रम्प यांनी मला भिंतीवर एवढ्या जोरात ढकललं होतं, की मला दुखापत झाली होती. मॅनहट्टनमधील बर्गडॉर्फ गुडमॅन स्टोअरच्या फिटिंग रुममध्ये ट्रम्प यांच्या या वागणुकीचा प्रतिकार करण्याचा मी प्रयत्न केला होता, असं कॅरोल यांनी सांगितलं.

1995 ते 1996 च्या दरम्यानची ही घटना आहे. ट्रम्प यांनी मला एक ड्रेस घालण्यासाठी सांगितलं, कारण तो ड्रेस ते खरेदी करणार होते. तेव्हा त्यांचा विवाह मार्ला मेपल्स यांच्याशी झाला होता. ट्रम्प यांनी दरवाजा बंद करताच माझं डोकं भिंतीवर आदळलं. ही घटना अत्यंत धक्कादायक होती आणि मी त्याचा प्रतिकारही केला होता हे मला महिलांना सांगायचंय, असं कॅरोल म्हणाल्या.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *