टॉयलेट साफ करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प ब्रश

न्यूयॉर्क: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच चर्चेत असतात. ते त्यांच्या वक्तव्यांसाठी ट्रोल होतच असतात. पण सध्या ते एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहेत. कारण आता त्यांच्या नावाचा टॉयलेट ब्रश बाजारात आला आहे. होय… न्यूझीलंडच्या एका व्यक्तीने हा कारनामा केला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत बनविण्यात आलेले सर्व ब्रश विकले गेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना कुठल्याही वेगळ्या …

टॉयलेट साफ करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प ब्रश

न्यूयॉर्क: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच चर्चेत असतात. ते त्यांच्या वक्तव्यांसाठी ट्रोल होतच असतात. पण सध्या ते एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहेत. कारण आता त्यांच्या नावाचा टॉयलेट ब्रश बाजारात आला आहे. होय… न्यूझीलंडच्या एका व्यक्तीने हा कारनामा केला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत बनविण्यात आलेले सर्व ब्रश विकले गेले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांना कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही, त्यांना तर मोठ्यांपासून ते लहानग्यांपर्यंत सर्व ओळखतात. त्यांच्या इतक्या प्रसिद्धीचं श्रेय हे त्यांचे मीम्स बनविणाऱ्यांना जातं. त्यांनी आपल्या मीम्सच्या माध्यमातून ट्रम्प यांना ही प्रसिद्धी मिळवून दिली. हे काय कमी होतं, म्हणून एका व्यक्तीने आणखी जास्त क्रिएटीव्हीटी दाखवत ‘डोनाल्ड ट्रम्प टॉयलेट ब्रश’ बनविला. या टॉयलेट ब्रशला डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्याचा आकार देण्यात आला आहे.यात एका पांढऱ्या स्टीकवर ट्रम्प यांची प्लास्टिकची प्रतिकृती बनविण्यात आली आहे. तर केसांच्या जागेवर ब्रश दिला आहे. हे एक हँडमेड प्रोडक्ट आहे. या टॉयलेट ब्रशची किंमत 23.50 डॉलर इतकी आहे. भारतीय रुपयांत या ब्रशची किंमत 1600 रुपये इतकी आहे.

 

हा टॉयलेट ब्रश लोकांच्या पसंतीस पडतो आहे. एका ऑनलाईन वेबसाईटवर हा टॉयलेट ब्रश विकला जात आहे. आतापर्यंतचे सर्व टॉयलेट ब्रश विकले गेले आहेत. याची बुकिंग 15 नोव्हेंबरला रात्री 8 वाजताच बंद झाली.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जनतेचं ‘किती प्रेम’ आहे हे या निमित्ताने कळून येतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *