इराण, कतार, चीन भुकंपाने हादरले; तीन जणांचा मृत्यू, आठ जखमी

इराण, कतार, चीन आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये आज जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या रिपोर्टनुसार या भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली.

इराण, कतार, चीन भुकंपाने हादरले; तीन जणांचा मृत्यू, आठ जखमी
अजय देशपांडे

|

Jul 02, 2022 | 8:10 AM

दुबई : इराण, कतार, चीन (China) आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये आज जोरदार भूकंपाचे धक्के (Earthquake in Middle East) जाणवले. युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या रिपोर्टनुसार या भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. इराणच्या स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या भूंकपात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू तर आठ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. दुबईलाही भूकंपाचा धक्का बसला. मिळत असलेल्या माहितीनुसार इराण, कतार, चीन आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. इराणमध्ये या भूकंपाची तीव्रता जास्त होती. इराणमध्ये (Iran Earthquake) या भूकंपात काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अद्याप निश्चित आकडा समोर आलेला नाही. स्थानिक वेळेनुसार पहाटे साडेतीनच्या सुमारास हा भूकंप झाला आहे. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळच्या सुमारास भूंकप

मिळत असलेल्या माहितीनुसार इराण, यूएई आणि कतारमध्ये आज सकाळी भूकंपाचे हादरे बसले. इराणमध्ये या भूकंपात काही लोकांच्या मृत्यूची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र नेमका आकडा अद्याप समोर येऊ शकलेला नाही. दुसरीकडे ‘नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी’ने दिलेल्या माहितीनुसार चीनमध्ये आज पहाटे साडेतीनच्या सुमारास भूकंप झाला. चीनमध्ये या भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल एवढी नोंदवण्यात आली आहे. तर इतर देशांमध्ये 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप झाला आहे. इराणमध्ये 25 जूनला देखील भूकंप झाला होता. 25 जूनला झालेल्या भूकंपाची तीव्रता 5.6 रिश्टर स्केल एवढी होती.

हे सुद्धा वाचा

 बचाव कार्याला सुरुवात

इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक वेळेप्रमाणे आज सकाळी आठ वाजता इराणला भूकंपाचे धक्के बसले. होर्मोझगान प्रांतातील किश बेटाच्या 22 किलोमीटर ईशान्येस या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपात किती जणांचा मृत्यू झाला याची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या घटनेत चार देशांत मिळून तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घटनेत तीसपेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. बचाव कार्य सुरू असल्याची माहिती इराणच्या प्रसारमाध्यमांकडून देण्यात आली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें