देशात अर्थव्यवस्थेपासून क्रिकेटपर्यंत फक्त निराशाच, पाकिस्तानच्या मुख्य न्यायाधीशांचं वक्तव्य

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी जनतेला अर्थव्यवस्थेबाबत, राजकीय घडामोडींबाबत आणि इतकंच नाही तर क्रिकेट संदर्भातही निव्वळ ‘निराशाजनक’ बातम्या ऐकायला मिळत आहेत, असं पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश आसिफ सईद खोसा यांनी बुधवारी सांगितलं.

Pakistan Cricket team, देशात अर्थव्यवस्थेपासून क्रिकेटपर्यंत फक्त निराशाच, पाकिस्तानच्या मुख्य न्यायाधीशांचं वक्तव्य

इस्लामाबाद : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी जनतेला अर्थव्यवस्थेबाबत, राजकीय घडामोडींबाबत आणि इतकंच नाही तर क्रिकेट संदर्भातही निव्वळ ‘निराशाजनक’ बातम्या ऐकायला मिळत आहेत, असं वक्तव्य पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश आसिफ सईद खोसा यांनी बुधवारी केलं. ‘देशाची अर्थव्यवस्था आईसीयूमध्ये आहे’, अशाप्रकारच्या बातम्या चांगल्या नाही, असं मुख्य न्यायाधीशांनी एका कार्यक्रमात सांगितलं.

“अर्थव्यवस्थेबाबत एक बातमी येते की, देशाची अर्थव्यवस्था आईसीयूमध्ये आहे. शिवाय कधी कधी नुकतिच आयसीयूतून बाहेर आली आहे. संसदेच्या नेत्यांसोबतच विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही संसदेत बोलण्यास परवानगी नाही. हे खरंच निराशाजनक आहे”, असं ते म्हणाले. यावरुन आसिफ सईद खोसा यांना ‘पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ’ आणि ‘पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज’ या राजकीय पक्षांवर निशाणा साधला.

“आम्ही चॅनल बदलतो आणि क्रिकेट वर्ल्ड कप पाहातो, तर तिथेही आमच्या वाट्याला निराशाचं येते”, असंही आसिफ सईद खोसा म्हणाले. अशा निराशापूर्ण वातावरणात पाकिस्तान जनतेला फक्त न्यायालयाकडून चांगल्या बातम्या ऐकायला मिळत आहेत.

VIDEO :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *