18 कोटी कमवण्यासाठी 60 हत्तींना मारण्याचे फर्मान

आपण बऱ्याचदा पाहिले असेल हत्तींच्या कळपांनी मानवी वस्तीत धुमाकूळ घालून तोड फोड (Elephant kill order by botswana government) केलेली.

Elephant kill order by botswana government, 18 कोटी कमवण्यासाठी 60 हत्तींना मारण्याचे फर्मान

गॅबारोनी (बोत्स्वाना) : आपण बऱ्याचदा पाहिले असेल हत्तींच्या कळपांनी मानवी वस्तीत धुमाकूळ घालून तोड फोड (Elephant kill order by botswana government) केलेली. त्यामुळे बरेच नुकसानही झालेले आहे. पण एक असा देश आहे. ज्या देशात थेट हत्ती मानवी वस्तीत घुसून नुकसान करतात म्हणून त्यांना थेट मारण्याचे आदेश दिले आहेत. तसेच एका हत्तीवर 31 लाख रुपयांची किंमतही (Elephant kill order by botswana government) लावली आहे.

बोत्स्वाना या देशाने हे आदेश दिले आहेत. येथील सरकारने 60 हत्तींना मारण्यासाठी 6 लायसेन्स जारी केले आहेत. लायसेन्समध्ये म्हटलं आहे की, हत्तीची किंमत 31 लाख रुपये आहे. याचा अर्थ हत्तीला मारल्यावर 31 लाख रुपये सरकारला द्यावे लागणार आहे. हत्तीला मारल्यावर सरकारला 18.60 कोटी रुपयांचा फायदा होणार आहे.

ज्या 6 ऐजन्सीला हत्ती मारण्याचे लायसेन्नस दिले आहे, ते या हत्तीला मारल्यानंतर हत्तींच्या अंगाचे भाग विकून पैसे कमावणार. यासाठी बोत्स्वानाच्या सरकारने हत्तीची किंमत ठरवली आहे. जी ऐजन्सी ही किंमत देणार नाही त्यांना हत्ती मारण्याची परवानगी दिली जाणार नाही.

बोत्स्वानामध्ये 1993 रोजी हत्तीची संख्या 80 होती. त्यामध्ये आता वाढ होऊन ती 1.30 लाख झाली आहे. बोत्स्वानामध्ये हत्तीची संख्या वाढल्यामुळे येथील सरकारने हा निर्णय घेतला आहे. हत्ती बऱ्याचदा मानवी वस्तीवर हल्ले करतात. त्यामुळे मोठे नुकसान होते. बऱ्याचदा अनेकांचा मृत्यूही होतो. यासाठी बोत्स्वानाच्या सरकारने 60 हत्ती मारण्याचे आदेश दिले आहेत.

बोत्स्वानाचे शेजारी देश झिम्बॉब्वे, जांबिया, नामिबिया आणि दक्षिण अफ्रीकाही गेल्या काही वर्षांपासून हत्तींसाठी नियम तयार करत आहेत. कारण माणून आणि हत्तींमध्ये संघर्ष कमी होऊ शकतो. त्यासोबत हत्तींच्या लोकसंख्येतही घट होऊ शकतो.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *