Video | अमेरिकेत सर्वात मोठं चक्रीवादळ, फ्लोरिडातल्या घरांत पाणीच पाणी, वाऱ्याचा वेग थरकाप उडवणारा, पहा…

अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात बुधवारी इयान चक्रीवादळाने धडक दिली. फ्लोरिडात मुसळधार पाऊस सुरु असतानाच सुसाट वेगानं वादळ आल्यानने राज्यात पूरस्थिती निर्माण झाली.

Video | अमेरिकेत सर्वात मोठं चक्रीवादळ, फ्लोरिडातल्या घरांत पाणीच पाणी, वाऱ्याचा वेग थरकाप उडवणारा, पहा...
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 12:23 PM

अमेरिकेत फ्लोरिडाच्या (Florida) दक्षिण पश्चिम किनारपट्टीवर शक्तिशाली चक्रीवादळ धडकले आहे. आधीच मुसळधार पाऊस सुरु असताना तब्बल 250 किमी प्रतितास या वेगाने हे चक्रीवादळ (Hurricane) दाखल झालं. त्यामुळे फ्लोरिडाची स्थिती गंभीर झाली आहे. मागील काही दशकांमधील अमेरिकेतील (America) हे सर्वाधिक शक्तिशाली चक्रीवादळ असल्याचं म्हटलं जातंय.

बुधवारी धडकलेल्या वादळाची तीव्रता अमेरिकेतील एकूण वादळ्यांच्या तुलनेत पाचव्या श्रेणीत असल्याचं म्हटलं जातंय. सध्या घटनास्थळी 250 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत.

या वादळाच्या मार्गात येणारी घरं रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत प्लोरिडातून लाखो लोकांना स्थलांतरीत करण्यात आलंय.

फ्लोरिडात जवळपास 18 लाख लोकांचा वीजपुरवठा वादळामुळे खंडित झाल्याची माहिती समोर आली आहे.

फ्लोरिडातलं हे वादळ किती विनाशकारी आहे याची कल्पना एका वक्तव्यावरून करता येईल. फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डिसेनटिस म्हणाले, राज्यासाठी हा सर्वात वाईट दिवस आहे. लोकांचे जीव वाचण्यासाठी सर्वांनी प्रार्थना करा…

आंतरराष्ट्रीय हरिकेन रिसर्च सेंटरचे असोसिएट डायरेक्टर एरिक सालना म्हणाले, या वादळामुळे समुद्राच्या पाण्यानं रौद्ररुप धारण केलंय. डोळ्यांनी पाहिल्याशिवाय तुम्ही याची कल्पनाही करू शकणार नाहीत.

एरिक सालना म्हणतात, आकडेवारी आणि इतिहास पाहिला असता, वाऱ्याऐवजी रुद्रावतार धारण केलेल्या पाण्यामुळेच चक्रीवादळात जास्त मृत्यू होतात. इयान चक्रीवादळ तर खूप गंभीर आहे.

फ्लोरिडातील पश्चिम किनारपट्टीला यासंदर्भात अलर्ट करण्यात आलं आहे. अमेरिकेतील अंतर्गत आणि बाहेरील देशात जाणाऱ्या 4 हजारांहून अधिक विमानांचे उड्डाण बुधवार आणि गुरुवारी रद्द करण्यात आले आहे.

फ्लोरिडा किनारपट्टीवर या वादळात एक अडकली. त्यातील 20 नागरिक बेपत्ता झाले होते. यूएस बॉर्डर पेट्रोल दलाकडूय यापकैकी तिघांना शोधण्यात यश आलंय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.