अमेरिकेत 12 डिसेंबरला कोरोनावरील पहिली लस दिली जाणार? : रिपोर्ट

अमेरिकेत 12 डिसेंबरला पहिल्या व्यक्तीला कोरोनावरील लस दिली जाऊ शकते. लस बनवणाऱ्या कंपनीने लसीचा आपत्कालीन वापर करण्याची शासनाकडे परवानगी मागितली आहे.

अमेरिकेत 12 डिसेंबरला कोरोनावरील पहिली लस दिली जाणार? : रिपोर्ट
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 6:54 AM

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या कोरोनाव्हायरस व्हॅक्सिन (Coronavirus Vaccine) प्रोग्रामच्या प्रमुखांनी सांगितले आहे की, अमेरिकेत 12 डिसेंबरला कोरोनावरील पहिलं लसीकरण केलं जाऊ शकतं. 10 डिसेंबरला एक अन्न व औषध प्रशासन सल्लागार समिती (Food and Drug Administration Advisory Committee) तयार होईल. ती समिती Pfizer ने केलेल्या विनंतीवर विचार करुन लसीकरणाची परवानगी देऊ शकते. Pfizer कंपनीने कोरोनावरील लसी बनवल्याचा दावा केला आहे. त्यांनी या लसीचा आपत्कालीन वापर करण्याची परवानगी मागितली आहे. (first american person might get Coronavirus Vaccine on december 11 or 12 after FDA Advisory Committee approval)

अमेरिकन ड्रग निर्माती कंपनी Pfizer ने कोरोनावरील 95 टक्के प्रभावी लस विकसित केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांनी लसीकरण करण्यासाठी अमेरिकन सरकारकडे या लसीच्या आपत्कालीन वापरासाठीच्या विशेष टॅगची मागणी केली आहे. कंपनीने म्हटलं आहे की, आपत्कालीन वापरासाठीच्या विशेष टॅगसंदर्भातील प्रक्रिया लवकरच सुरु केली जाऊ शकते आणि कोरोनावरील लसीचं वितरण पुढील महिन्याच्या सुरुवातीला केलं जाऊ शकतं.

कोरोनोव्हायरस व्हॅक्सिन प्रोग्राम ऑपरेशन वॉर्प स्पीडचे (coronavirus programme operation warp speed) प्रमुख डॉ. मोन्सेफ सलौई म्हणाले की, परवानगी मिळताच 24 तासांच्या आत लसीकरणाच्या ठिकाणी लस पोहोचवली जाऊ शकते. त्यामुळे मला वाटतं की, लसीसाठीचं अप्रूव्हल (approval) मिळताच पुढील एक किंवा दोन दिवसात म्हणजेच 11 किंवा 12 डिसेंबरला लसीकरणास सुरुवात केली जाईल.

Pfizer ने बनवलेली कोरोनावरील लस ही आतापर्यंतची सर्वात प्रभावी लस ठरली आहे. बुधवारी या लसीचं अंतिम टप्प्यातील परिक्षण झाले. कंपनीने याबाबत म्हटले आहे की, ही लस कोरोनावर 95 टक्के प्रभावी आहे.

भारतातील पहिली कोरोना लस ‘कोव्हॅक्सिन’ची तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू

कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गावर मात करण्यासाठी सगळेच देश लस निर्मितीच्या कामात गुंतले आहेत. अशात लस (Vaccine) उत्पादक कंपनी भारत बायोटेकने (Bharat Biotech) सोमवारी कोव्हिड – 19 संसर्गावर मात करणाऱ्या भारतातील पहिल्या देशी लसीची म्हणजेच ‘कोव्हॅक्सिन’ची (covaxin) तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू केली असल्याची घोषणा केली. फेज-3 चाचणीमध्ये संपूर्ण भारतातील 26,000 स्वयंसेवकांचा समावेश असणार आहे.

भारतात फेब्रुवारीपासून कोव्हिशील्ड’च्या वितरणाला सुरुवात; लशीची किंमत 500 ते 600 रुपये

ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केलेली ‘कोव्हिशील्ड’ ही लस फेब्रुवारी महिन्यात भारतात वितरीत व्हायला सुरुवात होईल. या लसीची किंमत 500 ते 600 रूपये इतकी असेल, अशी माहिती सिरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (adar poonawalla) यांनी दिली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटामुळे तणावाखाली असलेल्या भारतीयांना खूप मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सिरम इन्स्टिट्यूटकडून पुढच्या महिन्यात केंद्र सरकारकडे ‘कोव्हिशील्ड’च्या तातडीच्या मंजुरीसाठी अर्ज करण्यात येईल. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य सेवक आणि ज्येष्ठ लोकांना ही लस देण्याला प्राधान्य दिले जाईल. तर सामान्य जनतेसाठी मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून ही लस उपलब्ध होईल. ही लस साठवून ठेवण्यासाठी 2°C ते 8°C अंश सेल्सिअस तापमानाची गरज असेल. तर या लशीच्या एका डोसची किंमत 500 ते 600 रुपये असेल, अशी माहिती अदर पुनावाला यांनी दिली. मात्र, केंद्र सरकार या लशीची मोठ्याप्रमाणावर खरेदी करणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी या लशीची किंमत 225 ते 300 रुपये इतकी असेल, असेही पुनावाला यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Good News! भारतात डिसेंबरपर्यंत सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीचे 10 कोटी डोस पुरवणार

कोरोना लसीची चाचणी घेतलेल्या स्वयंसेवकाचा अनुभव, पहिल्या इंजेक्शनवेळी वेदना आणि तापाचा करावा लागला सामना!

(first american person might get Coronavirus Vaccine on december 11 or 12 after FDA Advisory Committee approval)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.