अंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी

आपण आतापर्यंत पृथ्वीवर झालेल्या अनेक गुन्ह्यांबद्दल ऐकले असेल. मात्र, पृथ्वीच्या बाहेर देखील माणसाच्या गुन्ह्यांची नोंद होण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने पृथ्वीच्या बाहेर अंतराळात झालेला गुन्हा नोंदवल्याचा दावा केला आहे.

अंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी
Follow us
| Updated on: Aug 25, 2019 | 6:06 PM

वॉशिंग्टन : आपण आतापर्यंत पृथ्वीवर झालेल्या अनेक गुन्ह्यांबद्दल ऐकले असेल. मात्र, पृथ्वीच्या बाहेर देखील माणसाच्या गुन्ह्यांची नोंद होण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने पृथ्वीच्या बाहेर अंतराळात झालेला गुन्हा नोंदवल्याचा दावा केला आहे. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने याची माहिती दिली आहे.

नासाची महिला अंतराळवीर एनी मॅकक्लेनवर हा आरोप आहे. तिने अंतराळातील स्पेस सेंटरमध्ये असताना तिची महिला जोडीदार समर वॉर्डनचे बँक खाते हॅक केले आहे. मागील वर्षापासून या समलैंगिक जोडप्यात वाद सुरू आहेत. त्यामुळे दोघींनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. वॉर्डनला मॅकक्लेनने नासाच्या एका कम्प्युटरवरून तिचे बँक खाते हॅक केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तिने तात्काळ फेडरल ट्रेड कमिशन आणि नासाच्या इंस्पेक्टर जनरल कार्यालयात याविरोधात तक्रार दाखल केली.

वॉर्डेनने मॅकक्लेनवर बेकायदेशीरपणे आपले बँक खाते हॅक करण्याच आरोप लावला आहे. जूनमध्ये अंतराळातून पृथ्वीवर परत आलेल्या मॅकक्लेनने देखील आपला गुन्हा कबुल केला आहे. मात्र यामागे तिने वेगळे कारण सांगितले आहे. ती म्हणाली, “वॉर्डनकडे मुल सांभाळण्यासाठी पुरेसे पैसे आहेत की नाही हे माहिती करण्यासाठी मी असे केले. मी याआधी देखील बँक खात्याचा जुना पासवर्ड वापरुन खात्याची माहिती घेतली होती. याची माहिती स्वतः वॉर्डनला देखील होती. वॉर्डनने असं करायला कधीही अडवले नाही.”

वॉर्डन माजी गुप्तचर अधिकारी आहे. तिने 2014 मध्ये मॅकक्लेनसोबत लग्न केले. त्यांच्याकडे आधीपासून एक मुलगा देखील होता. तो एक वर्षांचा आहे. याच मुलाच्या संगोपनासाठी मॅकक्लेनने पालकत्व मिळण्यासाठी दावा केला आहे. त्याला वॉर्डनने आव्हान दिले आहे. काही काळापूर्वी वॉर्डनने मॅकक्लेनवर हल्ला केला असाही आरोप मॅकक्लेनने केला होता. त्यानंतर 2018 मध्ये वॉर्डनने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. हल्लाप्रकरण याआधीच फेटाळण्यात आले आहे.

दरम्यान, मॅकक्लेन अंतराळात गुन्हा केल्याचा आरोप असलेली पहिली अंतराळवीर आहे. आता ती दोषी ठरणार की निरपराध हे येणारा काळच सांगेल.

नासा सध्या या अंतराळातील गुन्ह्याचा तपास करत आहे. मागील आठवड्यातच नासाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मॅकक्लेनला बोलावून चौकशी केली होती. नासासाठी हा गुन्हा अत्यंत नवा आहे. याआधी कधीही अशा प्रकरणाच्या गुन्ह्याची हाताळणी करण्याचा अनुभव नासाकडे नाही. स्पेस स्टेशनमध्ये अमेरिका, रशिया, जपान, यूरोप आणि कॅनडा अशा पाच देशांचे अंतराळवीर असतात. त्यामुळे त्यांनी एकमेकांशी कसे वागावे याचे काही आंतरराष्ट्रीय नियम आहेत. मात्र, ते केवळ अंतराळात लागू होतात.

क्लीवलँड विश्वविद्यालयात ग्लोबल स्पेस लॉ सेंटरचे संचालक मार्क सेंडहल यांना देखील आतापर्यंत असा गुन्हा घडल्याचे आठवत नाही. नासाच्या अधिकाऱ्यांना देखील अशा कोणत्याही गुन्ह्याची माहिती नाही.

याआधी अंतराळाशी संबंधित काही गुन्हे

2011 मध्ये चंद्रावरुन आणलेला दगड विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका स्पेस इंजिनिअरच्या विधवा बायकोला पकडण्यासाठी नासाने स्टिंग ऑपरेशन केले होते. असेच 2013 मध्ये एक प्रकरण घडले होते. रशियाचे सॅटेलाईट चीनकडून उध्वस्त करण्यात आलेल्या एका सॅटेलाईटला धडकले. त्यामुळे ते खराब झाले होते. 2017 मध्ये एका अमेरिकी व्यापाऱ्याने अंतराळ पर्यटन कंपनी त्याला अंतराळात घेऊन जाऊ शकली नाही म्हणून खटला दाखल केला होता. तसेच अंतराळ पर्यटन कंपनीकडून पैसे परत देण्याची मागणी केली होती.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.