पालकांकडून 200 रुपयांमध्ये मुलांची विक्री, खरेदीदारांकडून बलात्कार

मुलांच्या पालनपोषणासोबतच त्यांच्या संरक्षणाचीही जबाबदारी पालकांवर असते. मात्र, दक्षिण आफ्रिकेतील गांबिया देशात पालकच आपल्या मुलांना केवळ 200 रुपयांमध्ये विकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Foreigner tourist buying African children).

पालकांकडून 200 रुपयांमध्ये मुलांची विक्री, खरेदीदारांकडून बलात्कार
Follow us
| Updated on: Jan 19, 2020 | 2:29 PM

बंजूल (गांबिया) : मुलांच्या पालनपोषणासोबतच त्यांच्या संरक्षणाचीही जबाबदारी पालकांवर असते. मात्र, दक्षिण आफ्रिकेतील गांबिया देशात पालकच आपल्या मुलांना केवळ 200 रुपयांमध्ये विकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Foreigner tourist buying African children). यातील गंभीर बाब म्हणजे जे लोक या मुलांना खरेदी करत आहेत त्यांच्याकडून या मुलांवर बलात्कारही होत आहेत. ‘द सन’ या ब्रिटिश माध्यमानं ही बाब उघड केली (Foreigner tourist buying African children).

या अहवालानुसार ब्रिटनमधीलच अनेक लोक या मुलांच्या खरेदीच्या धंद्यात सहभागी आहेत. हे लोक गरीबीने ग्रासलेल्या आफ्रिकी देशांमधील कमकुवत कायद्यांचा गैरफायदा घेत हे गैरकृत्य करत आहेत. अनेक परदेशी नागरिक सुट्टी घालवण्यासाठी आफ्रिकेत जात असतात. यातीलच काहीजण तेथे जाऊन थेट मुलांची खरेदी करत त्यांचं लैंगिक शोषणही करतात.

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात बीचवरील रिसॉर्ट्समध्ये परदेशी पर्यटकांसोबत मोठ्या प्रमाणात आफ्रिकी मुलंही आढळून आली. मागील काही काळात ‘थॉमस कूक’ नावाची पर्यटन कंपनी बंद झाली. यामुळे गांबियात येणाऱ्या पर्यंटकांच्या संख्येत घटही झाली. याचा थेट परिणाम गांबियाच्या अर्थव्यवस्थेवर झाल्याचंही तेथील तज्ज्ञ सांगतात.

गांबियामध्ये पर्यटकांकडून आफ्रिकी अल्पवयीन मुलांना लक्ष्य केलं जात असल्याचं मत ‘चाईल्ड प्रोटेक्शन अलायन्स’चे राष्ट्रीय समन्वयक लेमिन फॅटी यांनी व्यक्त केलं आहे. अत्यंत गरीबीत राहत असल्याने येथील पालक आपल्या पाल्यांना अगदी कमी किमतीत विकत आहेत. लेमिन फॅटी म्हणाले, ‘आमच्या देशात ‘सेक्स’ स्वस्त आहे. मुलांना केवळ 185 रुपयांमध्येही विकलं जातं. अनेक पालकांना मुलांसोबत होणाऱ्या लैंगिक शोषणाची कल्पना असतानाही ते मुलांना विकतात. त्यांना जीवनावश्यक खाण्यापिण्याच्या गोष्टींची व्यवस्था करायची असल्याने ते असं करतात.’

काही पालक असेही आहेत ज्यांना मुलांसोबत होणाऱ्या लैंगिक शोषणाची कल्पना नसते. परदेशी पर्यटक मदतीच्या मदतीच्या भावनेनं मुलांना घेतात असंही काही पालकांना वाटतं. मात्र, वास्तवात या पर्यटकांचा उद्देश वेगळा असतो. सरकारही मुलांचं लैंगिक शोषण थांबवण्यासाठी पुरेशी कारवाई करत नसल्याचा आरोप होत आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.