ऐकावं ते नवलंच! फ्रान्समध्ये चक्क शाळेत कंडोम वेंडिंग मशीन

महत्त्वाचं म्हणजे या शाळांना तिथलं सरकार निधी पुरवतं. शिक्षण खात्याने केलेल्या सर्व्हेमध्ये फ्रान्समधील 96 टक्के शाळांमध्ये कंडोम वेंडिंग मशीन असल्याचं समोर आलं आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:45 PM, 31 Mar 2021
ऐकावं ते नवलंच! फ्रान्समध्ये चक्क शाळेत कंडोम वेंडिंग मशीन

पॅरिस : फ्रान्समधील तब्बल 96 टक्के शाळांमध्ये कंडोम वेंडिग मशीन आहेत. हायस्कूल, पब्लिक आणि प्रायव्हेट स्कूलमध्ये कंडोम वेंडिंग (First Condom vending Machin) मशीन बसवण्यात आली आहेत. महत्त्वाचं म्हणजे या शाळांना तिथलं सरकार निधी पुरवतं. शिक्षण खात्याने केलेल्या सर्व्हेमध्ये फ्रान्समधील 96 टक्के शाळांमध्ये कंडोम वेंडिंग मशीन असल्याचं समोर आलं आहे. (France Installs First Condom vending Machine in High School)

1992 मध्ये इथे शाळांमध्ये कंडोम वेंडिंग मशीन बसवण्यास सुरुवात

प्रेमाचं शहर अशी ओळख असलेल्या पॅरिसमध्ये एड्ससारख्या रुग्णांची संख्या मोठी होती. त्यामुळेच आपण विचारही करु शकणार नाही. त्यावेळी म्हणजेच 1992 मध्ये इथे शाळांमध्ये कंडोम वेंडिंग मशीन बसवण्यास सुरुवात झाली. म्हणजे जवळपास 29 वर्षापूर्वी शाळेमध्ये पहिलं कंडोम वेंडिंग मशीन बसवण्यात आलं. प्रेमाला हा, मृत्यूला ना (Love, yes; death, no) अशी या मागची संकल्पना होती. जवळपास 30 वर्षापूर्वी सुरु झालेली ही मोहीम आता 96 टक्केपर्यंत पोहोचली आहे. फ्रान्समधील 96 टक्के शाळांमध्ये ही मशीन्स बसवण्यात आली आहेत.

पूर्वी शाळांमध्ये कंडोम मशीन बसवण्याला फ्रान्समधील कट्टरतावाद्यांसह सर्वसामान्यांनीही विरोध केला होता. मात्र हळूहळू हा विरोध बारगळला आणि पुढे शाळांमध्ये कंडोम मशीन बसवण्याचं समर्थन जवळपास 83 टक्के लोकांनी केलं.

संबंधित बातम्या

…म्हणूनच पुरुषांना अंधारात सेक्स करणे आवडते, तज्ज्ञांनी सांगितलं ‘कारण’

आधी तिनं नवऱ्याला पॉर्न व्हिडीओ,  दाखवले, नंतर खुर्चीला बांधलं आणि पुढं जे केलं त्यानं महाराष्ट्र हादरला !

France Installs First Condom vending Machine in High School