जी-20 देशांकडून भारताची 'ही' विनंती मान्य

ब्यूनस आयर्स, अर्जेंटिना : 2022 च्या जी-20 देशांच्या संमेलनाच्या यजमानपदाचा मान भारताला मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली. 2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. जी-20 हा जगातिल प्रमुख 20 अर्थव्यवस्थांचा समूह आहे. या सर्व देशांच्या प्रमुखांना भारतात आणणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा धोरणात्मक विजय मानला जात आहे. […]

जी-20 देशांकडून भारताची 'ही' विनंती मान्य
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

ब्यूनस आयर्स, अर्जेंटिना : 2022 च्या जी-20 देशांच्या संमेलनाच्या यजमानपदाचा मान भारताला मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली. 2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. जी-20 हा जगातिल प्रमुख 20 अर्थव्यवस्थांचा समूह आहे. या सर्व देशांच्या प्रमुखांना भारतात आणणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा धोरणात्मक विजय मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्जेंटिनाच्या राजधानीत सुरु असलेल्या जी-20 परिषदेदरम्यानच भारताला यजमानपद मिळाल्याची घोषणा केली. 2022 च्या जी-20 परिषदेचं यजमानपद इटलीला मिळणार होतं. पण ते भारताला देण्यात आल्यामुळे मोदींनी इटलीच्या प्रमुखांचे आभारही मानले. यासोबतच त्यांनी जी-20 देशांच्या सर्व प्रमुखांना भारतात येण्याचं निमंत्रण दिलं.  

2022 हे वर्ष भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण, याच वर्षी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या खास वर्षात भारत जी-20 देशांचं स्वागत करण्यास उत्सुक आहे. जगातील वेगाने वाढणाऱ्या सर्व अर्थव्यवस्थांनी भारतात यावं, भारताचा समृद्ध इतिहास आणि विविधता जाणून घ्यावी, तसेच भारताच्या आदरातिथ्याचा अनुभव घ्या, अशा शब्दात मोदींनी जी-20 देशांना निमंत्रण दिलं. जी-20 जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचा समूह आहे, ज्यात अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, चीन, युरोपीय संघ, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, ब्रिटन आणि अमेरिका यांचा यामध्ये समावेश आहे.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.