VIDEO: 'लाईव्ह शो' चर्चेत पाहुण्यांची लाथा-बुक्क्यांनी मारहाण

काबूल: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एक अजब घटना घडली. टीव्ही चॅनलवर लाईव्ह शोमध्ये शांततेबाबत सुरु असलेल्या चर्चेदरम्यान, दोन तज्ज्ञ आपसात भिडले. त्यांनी एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तालिबान आणि अमेरिका यांच्यातील शांतता याबाबत काबूल टीव्ही स्टुडिओत चर्चा सुरु होती. त्यावेळी अँकरने कोणता तरी प्रश्न विचारला.  मात्र त्यानंतर स्टुडिओत बसलेले दोन्ही पाहुणे असे काही भिडले की, ही …

VIDEO: 'लाईव्ह शो' चर्चेत पाहुण्यांची लाथा-बुक्क्यांनी मारहाण

काबूल: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एक अजब घटना घडली. टीव्ही चॅनलवर लाईव्ह शोमध्ये शांततेबाबत सुरु असलेल्या चर्चेदरम्यान, दोन तज्ज्ञ आपसात भिडले. त्यांनी एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तालिबान आणि अमेरिका यांच्यातील शांतता याबाबत काबूल टीव्ही स्टुडिओत चर्चा सुरु होती. त्यावेळी अँकरने कोणता तरी प्रश्न विचारला.  मात्र त्यानंतर स्टुडिओत बसलेले दोन्ही पाहुणे असे काही भिडले की, ही चर्चा सुरु आहे की रस्त्यावरची भांडणं सुरु आहेत, असा प्रश्न पडला.

दोन्ही पाहुणे एकमेकांना लाथाबुक्क्यांनी ठोकू लागले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद होत होता. अँकर त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होता, मात्र तोपर्यंत दोघांनी एकमेकांना धुतलं होतं.

दोघेही एकमेकांना भाडंत, पडत-झडत स्टुडिओबाहेर आले. लाईव्ह प्रोग्रॅममध्येच ही राडेबाजी सुरु होती.

या सर्व हाणामारीनंतर न्यूज चॅनलच्या स्टाफने कसंबसं दोन्ही पाहुण्यांना रोखलं. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जगभरात या व्हिडीओची चर्चा सुरु आहे.

शांतता या विषयावर चर्चा करणारे पाहुणेच जर शांतपणे चर्चा करु शकत नसतील, तर ते नागरिकांना काय संदेश देणार हा सवाल आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *