घर घेताय? 'या' बेटावर केवळ 78 रुपयात टोलेजंग घर! कारण...

रोम (इटली) : एक युरोमध्ये (78 रुपये) घर खरेदी करा… आता तुम्ही म्हणालं असं कुठे होतं? तुमचंही बरोबर आहे. आज जिथे जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत, तिथे एका युरोमध्ये घर काय, मातीचा कणही येणार नाही. पण जगात एक असं ठिकाण आहे जिथं या एका युरोमध्ये अख्ख घर विकत मिळतं. ते ठिकाण म्हणजे इटलीतील संबुका बेट. …

घर घेताय? 'या' बेटावर केवळ 78 रुपयात टोलेजंग घर! कारण...

रोम (इटली) : एक युरोमध्ये (78 रुपये) घर खरेदी करा… आता तुम्ही म्हणालं असं कुठे होतं? तुमचंही बरोबर आहे. आज जिथे जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत, तिथे एका युरोमध्ये घर काय, मातीचा कणही येणार नाही. पण जगात एक असं ठिकाण आहे जिथं या एका युरोमध्ये अख्ख घर विकत मिळतं. ते ठिकाण म्हणजे इटलीतील संबुका बेट. हे एक अत्यंत सुंदर असं बेट आहे. याच बेटावरील लोकांनी आपली घरं विकायला काढली आहेत. त्यांची मूळ किंमत एक युरो म्हणजेच केवळ 78 रुपये 37 पैसे इतकी होती.

इटलीच्या सिसली येथे संबुका हे सुंदर बेट आहे. या बेटावर राहणाऱ्या लोकांकडे उदर्निवाहाचे साधन नसल्याने, त्यांना त्यांची घरं विकावी लागत आहेत. काही काळापूर्वीपर्यंत या बेटावर मोठ्याप्रमाणात लोकसंख्या होती. मात्र, 1968 मध्ये आलेल्या भूकंपानंतर इथली परिस्थिती बदलली. औद्योगिकीकरण तसेच शहराकडे आकर्षित होऊन अनेकांनी या बेटावरुन स्थलांतर केलं. त्यानंतर या बेटावरील लोकसंख्येत घट झाली. आता इथे बोटावर मोजण्या इतकी लोकं आणि काही इमारती शिल्लक आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात या बेटावरील घरांच्या विक्रीची जाहिरात काढण्यात आली. त्यावोळी यांची मूळ किंमत 1 युरो इतकी ठेवण्यात आली होती. या घरांना विकत घेण्यासाठी जगभरातील लोकांनी लिलाव पद्धतीने बोली लावली गेली. इस्रायल, रशिया, ब्रिटन आणि चिलीच्या लोकांनी या घरांसाठी बोली लावली. या लिलावात सर्वात स्वस्त घर 1000 युरो म्हणजेच 78 हजार रुपयांमध्ये विकलं गेलं तर, सर्वात महाग घर 25 हजार युरो म्हणजेच 20 लाख रुपयांमध्ये विकलं गेलं.

डिस्कवरीनेही इथली घरं विकत घेतली

तुम्ही ही घरं विकत घेऊ शकले नाही, म्हणून निराश होण्याची गरज नाही. कारण तुम्ही इथली ही घरं आणि संबुका बेटावरील लोकांची जीवनशैली जवळून अनुभवू शकणार आहात. डिस्कवरी चॅनेलनेही या बेटावरील काही घरं विकत घेतली आहेत. डिस्कवरी या संबुका बेटावरील लोकांवर एक कार्यक्रम करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी ही घरं विकत घेण्यात आली आहेत. संबुका बेटावरील लोकांच्या समस्या त्यांची परिस्थितीशी झुंज देण्याचा प्रवास या कार्यक्रमात दाखवण्यात येणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *