AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : दादूस तुला किती बायका आहेत रे… ट्रम्प यांचा सीरियाच्या राष्ट्रपतींना विचित्र सवाल, Video व्हायरल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या बेधडक वर्तनासाठी आणि वक्तव्यांसाठीही प्रसिद्ध आहे. ते कधी काय बोलतीय याचा काहीच भरवसा नाही. नुकतीच त्यांनी सीरियाचे राष्ट्रपति अहमद अल-शरा याची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. मात्र त्यावेळी ट्रम्प यांनी सीरियाच्या राष्ट्रपतींना थेट असा प्रश्न विचारला की तो ऐकून उपस्थितांना ठसकाच लागला. आपण काय ऐकल याबद्दल कोणालाच विश्वास बसत नव्हता.

Donald Trump : दादूस तुला किती बायका आहेत रे… ट्रम्प यांचा सीरियाच्या राष्ट्रपतींना विचित्र सवाल, Video व्हायरल
डोनाल्ड ट्रम्प यांचा सीरियाच्या राष्ट्रपतींना विचित्र सवालImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Nov 13, 2025 | 9:04 AM
Share

ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये नुकतीच सीरियाचे राष्ट्रपती अहमद अल-शरा यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांच्यात विविध मुद्यांवर चर्चा झाली. खरंतर ही भेट होईल हे आधीच शक्यच वाटत नव्हतं, पण अखेर ती झालीच. काही वर्षांपूर्वी ही एक अशक्य वाटणारी बैठक होती. 1946 मध्ये फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सीरियाच्या राष्ट्रप्रमुखांनी व्हाईट हाऊसला भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती. याच भेटीदरम्यन ट्रम्प यांनी मजेतच शरा यांना काही प्रश्न विचारले. मात्र ट्रम्प आणि अल-शारा यांच्यातील या भेटीच्या राजकीय चर्चेपेक्षा त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे जास्त चर्चेत आहे. या भेटीदरम्यान ट्रम्प यांनी सीरियाच्या राष्ट्रपतींना पर्फ्युम गिफ्ट केला आणि एक असा प्रश्न विचारला ज्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. अल-शरा यांच्याकडे हसून पहात ट्रम्प यांनी त्यांना थेट विचारलं – तुमच्या किती पत्नी आहेत?

या भेटीचा आणि त्या प्रश्नाचा व्हिडीओ सध्या वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दोन्ही नेते मजेत एकमेकांश बोलताना दिसतात. त्यावेळी ट्रम्प यांनी अल-शरा यांना परफ्युमची बॉटल गिफ्ट केली. त्यांनी शरा यांच्यावर परफ्यूम स्प्रे केला, “हा सर्वात अद्भुत सुगंध आहे… आणि दुसरा तुमच्या पत्नीसाठी आहे” असं ते म्हणाले. मात्र पुढच्याच क्षणी त्यांनी गमतीने विचारले, “तुम्हाला किती बायका आहेत?”

ट्रम्पना दिलं गिफ्ट

त्यावर अल-शारा यांनी उत्तर दिलं, “एक,” ते ऐकून जोरदार हशा पिकला. दरम्यान या मीटिंगवेळी ट्रम्प यांना काही प्रतीकात्मक भेटवस्तू दिल्याचे अल-शारा यांनी सांगितलं. त्यांनी – प्राचीन सीरियन कलाकृतींच्या प्रतिकृती – (ज्यामध्ये)  “इतिहासातील पहिली वर्णमाला, पहिले टपाल तिकीट” यांचाही समावेश आहे, अशा भेटी दिल्या. या भेटीदरम्यान, दोघांनी अमेरिका आणि सीरियामधील संबंध मजबूत करण्यावर आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली. अल-शारा यांनी आयसिसविरुद्धच्या लढाईत मदत करणाऱ्या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडीत सामील होण्याचे वचन दिले.

सीरियाचे 43 वर्षीय राष्ट्रपती अल-शारा, ज्यांना अबू मोहम्मद अल-जुलैनी म्हणूनही ओळखले जाते, ते एकेकाळी अल-कायदा कमांडर होते. अमेरिकेने त्यांना दहशतवादी म्हणून घोषित केले होते आणि त्यांच्या डोक्यावर 10 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस ठेवले होते. मात्र तो भूतकाळ होता,  असे शरा यांनी सांगितलं.  आता ट्रम्प आणि अल-शारा यांची झालेली ही भेट जागतिक राजनैतिक क्षेत्रातील एक मोठे पाऊल मानले जात आहे. या बैठकीदरम्यान, ट्रम्प म्हणाले की त्यांचे अल-शाराशी चांगले संबंध आहेत. ते चांगल्या प्रकारे काम करू शकतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.