
ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये नुकतीच सीरियाचे राष्ट्रपती अहमद अल-शरा यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांच्यात विविध मुद्यांवर चर्चा झाली. खरंतर ही भेट होईल हे आधीच शक्यच वाटत नव्हतं, पण अखेर ती झालीच. काही वर्षांपूर्वी ही एक अशक्य वाटणारी बैठक होती. 1946 मध्ये फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सीरियाच्या राष्ट्रप्रमुखांनी व्हाईट हाऊसला भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती. याच भेटीदरम्यन ट्रम्प यांनी मजेतच शरा यांना काही प्रश्न विचारले. मात्र ट्रम्प आणि अल-शारा यांच्यातील या भेटीच्या राजकीय चर्चेपेक्षा त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे जास्त चर्चेत आहे. या भेटीदरम्यान ट्रम्प यांनी सीरियाच्या राष्ट्रपतींना पर्फ्युम गिफ्ट केला आणि एक असा प्रश्न विचारला ज्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. अल-शरा यांच्याकडे हसून पहात ट्रम्प यांनी त्यांना थेट विचारलं – तुमच्या किती पत्नी आहेत?
या भेटीचा आणि त्या प्रश्नाचा व्हिडीओ सध्या वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दोन्ही नेते मजेत एकमेकांश बोलताना दिसतात. त्यावेळी ट्रम्प यांनी अल-शरा यांना परफ्युमची बॉटल गिफ्ट केली. त्यांनी शरा यांच्यावर परफ्यूम स्प्रे केला, “हा सर्वात अद्भुत सुगंध आहे… आणि दुसरा तुमच्या पत्नीसाठी आहे” असं ते म्हणाले. मात्र पुढच्याच क्षणी त्यांनी गमतीने विचारले, “तुम्हाला किती बायका आहेत?”
ट्रम्पना दिलं गिफ्ट
त्यावर अल-शारा यांनी उत्तर दिलं, “एक,” ते ऐकून जोरदार हशा पिकला. दरम्यान या मीटिंगवेळी ट्रम्प यांना काही प्रतीकात्मक भेटवस्तू दिल्याचे अल-शारा यांनी सांगितलं. त्यांनी – प्राचीन सीरियन कलाकृतींच्या प्रतिकृती – (ज्यामध्ये) “इतिहासातील पहिली वर्णमाला, पहिले टपाल तिकीट” यांचाही समावेश आहे, अशा भेटी दिल्या. या भेटीदरम्यान, दोघांनी अमेरिका आणि सीरियामधील संबंध मजबूत करण्यावर आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली. अल-शारा यांनी आयसिसविरुद्धच्या लढाईत मदत करणाऱ्या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडीत सामील होण्याचे वचन दिले.
‘How many wives? One?’ Trump asks Syria’s new leader in White House — video
Trump gifted Al-Shaar perfume and went on to SPRAY him with it
‘This is the best fragrance! And the other one is for your wife’
Al-Sharaa assured Trump he only has one wife. Vibe check passed, too pic.twitter.com/SAjO6Vc8GH
— RT (@RT_com) November 12, 2025
सीरियाचे 43 वर्षीय राष्ट्रपती अल-शारा, ज्यांना अबू मोहम्मद अल-जुलैनी म्हणूनही ओळखले जाते, ते एकेकाळी अल-कायदा कमांडर होते. अमेरिकेने त्यांना दहशतवादी म्हणून घोषित केले होते आणि त्यांच्या डोक्यावर 10 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस ठेवले होते. मात्र तो भूतकाळ होता, असे शरा यांनी सांगितलं. आता ट्रम्प आणि अल-शारा यांची झालेली ही भेट जागतिक राजनैतिक क्षेत्रातील एक मोठे पाऊल मानले जात आहे. या बैठकीदरम्यान, ट्रम्प म्हणाले की त्यांचे अल-शाराशी चांगले संबंध आहेत. ते चांगल्या प्रकारे काम करू शकतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला