पत्नीच्या हत्येअगोदर सर्च केलं, ‘I want to kill my wife’

  • Updated On - 4:54 pm, Fri, 5 July 19 Edited By:
पत्नीच्या हत्येअगोदर सर्च केलं, 'I want to kill my wife'

लंडन : इंग्लंडमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या समलिंगी फार्मासिस्टला ऑस्ट्रेलियातील बॉयफ्रेंडसोबत नवं आयुष्य सुरु करायचं होतं. यासाठी अडथळा ठरत असलेल्या पत्नीची हत्या केल्याप्रकरणी या फार्मासिस्टला दोषी ठरवण्यात आलं आहे. धक्कादायक म्हणजे, पत्नीला कसं मारायचं हे या फार्मासिस्टने गुगलवर सर्च केलं. बॉयफ्रेंडसोबत राहणं हाच पत्नीला मारण्याचा उद्देश नव्हता, तर पत्नीच्या मृत्यूनंतर मिळणारे 3.5 मिलियन डॉलरही याला कारणीभूत ठरले.

मीतेश पटेल नावाच्या व्यक्तीने इंग्लंडमधील मिडल्सब्रफमधील त्याच्या घरी पत्नीला गळा दाबून मारलं. आपल्या पत्नीची कुणी तरी घरात घुसून हत्या केल्याचं नाटकही या फार्मासिस्ट पतीने केलं. इन्शोरन्सची जी रक्कम मिळणार होती, त्याचं लालच यामागे होतं.

मीतेश पटेलकडून गुन्हा कबूल करुन घेण्यासाठी तपास यंत्रणांनी एका हेल्थ अॅपचा वापर केला, ज्याचा वापर इंग्लंडमध्ये कायदेशीर मदतीसाठी केला जातो. या फार्मासिस्टने अगोदर पत्नीच्या हत्येची कबुली देण्यास नकार दिला आणि स्वतःच एक नाटक रचलं. नोव्हेंबरमध्ये हे सर्व प्रकरण समोर आलं आणि अखेर न्यायालयाने त्याला दोषी ठरवलंय.

मीतेश पटेलचे सिडनीत राहणाऱ्या एका समलिंगी डॉक्टरशी संबंध होते. या दोघांची ओळख एका डेटिंग अॅपवर झाली होती. जेसिकाच्या विम्याची रक्कम घेऊन ऑस्ट्रेलियात स्थायिक होण्याचा पटेलचा प्लॅन होता, असं तपासातून समोर आलं.