… शांततेच्या नोबेलसाठी तेच खरे पात्र : इम्रान खान

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना शांततेचा नोबेल पुरस्कार द्या अशी अजब मागणी पाकिस्तानात होत असताना, त्याबाबत स्वत: इम्रान खान यांनी भाष्य केलं आहे. मी नोबेल पुरस्कारासाठी पात्र नाही, अशा आशयाचं ट्विट इम्रान खान यांनी केलं. “मी नोबेर शांती पुरस्कारासाठी पात्र नाही. जो कोणी काश्मीरची समस्या काश्मिरींच्या इच्छेप्रमाणे सोडवेल, तोच या पुरस्कारासाठी पात्र असेल” […]

... शांततेच्या नोबेलसाठी तेच खरे पात्र : इम्रान खान
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना शांततेचा नोबेल पुरस्कार द्या अशी अजब मागणी पाकिस्तानात होत असताना, त्याबाबत स्वत: इम्रान खान यांनी भाष्य केलं आहे. मी नोबेल पुरस्कारासाठी पात्र नाही, अशा आशयाचं ट्विट इम्रान खान यांनी केलं. “मी नोबेर शांती पुरस्कारासाठी पात्र नाही. जो कोणी काश्मीरची समस्या काश्मिरींच्या इच्छेप्रमाणे सोडवेल, तोच या पुरस्कारासाठी पात्र असेल” असं इम्रान खान यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 26 फेब्रुवारीला पाकिस्तानी वायूसीमा भेदून बालाकोट परिसरात बॉम्ब टाकले होते. भारतीय वायूसेनेच्या हल्ल्यात शेकडो दहशतवादी ठार झाल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं. मात्र त्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्ताननेही भारतीय हवाई हद्दीत घुसून बॉम्ब फेकले. मात्र भारतीय जवानांनी पाकिस्तानचं F16 हे विमान पाडलं. पण या विमानाचा पाठलाग करताना भारतीय वायूदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हे पाकिस्तानच्या ताब्यात सापडले.

पाकिस्तानने अभिनंदन यांना पकडल्याने भारताने त्यांच्यावर चहूबाजूंनी दबाव आणला. त्यानंतर इम्रान खान यांनी पाकिस्तानी संसदेत शांततेसाठी म्हणून अभिनंदन यांची सुटका करणार असल्याची घोषणा केली. विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने 1 मार्चला सुटकाही झाली.

इम्रान खान यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांचं पाकिस्तानसह विविध देशांनी कौतुक केलं. युद्ध नको, शांतता हवी अशी भूमिका घेत इम्रान खान यांनी चर्चेसाठी आमंत्रण दिलं. इम्रान खान यांच्या या पवित्र्यामुळे पाकिस्तानी सोशल मीडियात त्यांना शांततेचं नोबेल देण्याची मागणी होऊ लागली.

सोशल मीडियावर त्याबाबत अनेक हॅशटॅग ट्रेण्ड झाले. मात्र आता खुद्द इम्रान खान यांनीच आपण नोबेल पारितोषकासाठी पात्र नसल्याचं म्हटलं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.