इम्रान खान यांचं स्मितहास्य जीवघेणं, पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर महिला मंत्री फिदा

पाकिस्तानच्या केंद्रीय मंत्री जरताज गुल वजीर यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या स्मितहास्याचं कौतुक केलं आहे (Pakistan minister zartaj gul wazir on imran khan smile).

इम्रान खान यांचं स्मितहास्य जीवघेणं, पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर महिला मंत्री फिदा

इस्लामाबाद : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पाकिस्तानच्या केंद्रीय मंत्री जरताज गुल वजीर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या स्मितहास्याचं कौतुक करताना दिसत आहेत (Pakistan minister zartaj gul wazir on imran khan smile). “इम्रान खान यांचं स्मितहास्य जीवघेणं आहे. त्यांची देहबोली अतिशय सुंदर आहे”, असं जरताज या व्हिडिओत बोलताना दिसत आहेत.

“पंतप्रधान इम्रान खान यांचं व्यक्तीमत्त्व खूप चांगलं आहे. त्यांची देहबोली अतिशय सुंदर आहे. ते एक चमत्कारिक पुरुष आहेत. जेव्हा कधी ते कोणत्या समस्येला हातात घेतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जीवघेणं स्मितहास्य दिसतं. जेव्हा ते बैठक कक्षात दाखल होतात तेव्हा माझ्या सर्व शंका उडून जातात”, असं वक्तव्य जरताज यांनी केलं (Pakistan minister zartaj gul wazir on imran khan smile).

जरताज यांनी इम्रान खान यांच्याबाबत केलेल्या या स्तुतीसुमनांवरुन त्या टीकेच्या धनी ठरल्या आहेत. पाकिस्तानमध्ये त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. सोशल मीडियावरही त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे.

सोशल मीडियावर जरताज यांच्यावर टीका करताना एका युजरने लिहिलं की, “संपूर्ण जगात ही बिनकामाची महिला मंत्री आहे.” तर “बॉलिवूडमध्ये सलमान खान जसं काम करतो तसं काम करण्यासाठी तुम्ही तुमच्या पंतप्रधानांना तयार करा”, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *