अमेरिकेत 136 प्रवाशांसह विमान नदीत कोसळलं

न्यूयॉर्क : अमेरिकेतील फ्लोरिडा इथं मोठी विमान दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेलं विमान थेट नदीत कोसळलं. बोईंग 737 हे विमान क्यूबावरुन फ्लोरिडाकडे येत होतं. त्यावेळी लँडिंगदरम्यान ही दुर्घटना घडली. या विमानात 136 प्रवासी होते. धावपट्टीवरुन विमान थेट नदीत कोसळलं. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. #JSO Marine Unit was called to assist @NASJax_ in reference …

Boeing 737 commercial jet with 136 people on board slides into St. Johns River near Jacksonville Florida after landing, अमेरिकेत 136 प्रवाशांसह विमान नदीत कोसळलं

न्यूयॉर्क : अमेरिकेतील फ्लोरिडा इथं मोठी विमान दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेलं विमान थेट नदीत कोसळलं. बोईंग 737 हे विमान क्यूबावरुन फ्लोरिडाकडे येत होतं. त्यावेळी लँडिंगदरम्यान ही दुर्घटना घडली. या विमानात 136 प्रवासी होते. धावपट्टीवरुन विमान थेट नदीत कोसळलं. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


दरम्यान, विमानातून बाहेर काढलेल्या प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सर्वजण सुखरुप असून, कोणाला खरचटलेलंही नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान फ्लोरिडाच्या नौदलाच्या विमानतळ जॅक्शनविले इथल्या रन वे अर्थात धावपट्टीवरुन घसरलं आणि थेट सेंट जॉन नदीत जाऊन कोसळलं.


शुक्रवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. बोईंग 737 हे व्यावसायिक विमान होतं. विमान उतरत असताना ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. विमान ज्या नदीत कोसळलं त्या नदीत पाणी कमी होतं, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *