AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत मालामाल, रशियाने थेट दिली ही मोठी सूट, अमेरिकेला धक्का, डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातात…

America Tariff : भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेचा थयथयाट बघायला मिळाला. हेच नाही तर अनेक गंभीर आरोप भारतावर डोनाल्ड ट्रम्प यांनी लावली. भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी विविध प्रकारे दबाव टाकण्याचे काम अमेरिकेने केले.

भारत मालामाल, रशियाने थेट दिली ही मोठी सूट, अमेरिकेला धक्का, डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातात...
America Tariffs Russia oil
| Updated on: Oct 10, 2025 | 4:02 PM
Share

भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता भारतावर मोठा दबाव अमेरिका टाकत आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली नसल्याने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. शिवाय विविध प्रकारे भारताला अडचणीत आणण्याचे काम डोनाल्ड ट्रम्प करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचे नुकताच नोबेल शांतता पुरस्काराचे स्वप्न भंगले आहे. भारताने नोबेल पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा जाहीर केला नव्हता. मात्र, हा पुरस्कार मिळवण्यासाठी ते सतत प्रयत्न करताना दिसले. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या टॅरिफच्या निर्णयामुळे भारतातून अमेरिकेत जाणारी 70 टक्के निर्यात बंद झाली. हेच नाही तर फार्मा कंपन्यांनाही मोठा दणका डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला असून फार्माच्या वस्तूंवर 100 टक्के टॅरिफ लावण्यात आला.

अमेरिका भारतासाठी मोठी बाजारपेठ राहिली आहे. आता निर्यात कमी झाल्याने त्यामधून होणारे नुकसान भरून काढण्यासाठी भारत विविध मार्ग काढत आहे. काही देशांसोबत भारताने मुक्त व्यापार करार देखील केलाय. अमेरिकेचे म्हणणे आहे की, भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानेच रशिया-युक्रेन युद्ध इतके दिवस सुरू आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली तर हे युद्ध अधिक काळ चालणार नाही.

अमेरिकेसोबत सुरू असलेल्या व्यापार चर्चेदरम्यान भारत येत्या काही महिन्यांत रशियन कच्च्या तेलाची आयात वाढवण्याच्या तयारीत आहे. यावरून असे दिसून येते की ट्रम्पचा डाव त्यांच्यावरच उलटा पडला. टॅरिफनंतर भारत आणि अमेरिकेतील तणाव वाढला असून व्यापार चर्चा फक्त सुरू आहे पण करार कोणतेही होत नाहीत. उलट भारत रशियाकडून अधिक तेल खरेदी करत आहे. तो आकडा सतत वाढताना दिसतोय.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, रशिया हा भारताला कच्च्या तेलाच्या आयातीवर दुप्पट सूट देत आहे. रशियाने नोव्हेंबरपासून भारतासाठी ब्रेंट क्रूड लोडिंगवर प्रति बॅरल $2 ते $2.50 पर्यंत सूट दिलीये. रशियाने दिलेल्या सूटमुळे भारताचे अमेरिकेकडून होणाऱ्या नुकसानाची भरपाई यामुळे होईल. रशिया भारताला सतत कच्च्या तेलात सूट देत असल्याने भारताने देखील निर्यात वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....