AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात खळबळ! भारताचा डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशारा, 3D चा वापर करून शस्त्रे…

S Jaishankar on Trump Tariff : अमेरिकेने भारतावर अत्यंत मोठा टॅरिफ लावला. अमेरिकेच्या टॅरिफनंतर भारताला मोठा धक्का बसला. मात्र, भारताने यावर अत्यंत सावध भूमिका घेतली. भारत देखील अमेरिकेच्या विरोधात मैदानात उतरल्याचे बघायला मिळतंय.

जगात खळबळ! भारताचा डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशारा, 3D चा वापर करून शस्त्रे...
trump tariff india
| Updated on: Oct 07, 2025 | 12:03 PM
Share

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे एकच गोंधळ उडाला. भारत आणि अमेरिकेत अजूनही व्यापार चर्चा सुरू आहे. नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत करार होतील, असे अंदाज आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बदलत्या जागतिक आर्थिक परिस्थितीला भारताची रणनीती नेमकी काय असणार यावर भाष्य केले. जेएनयू येथील स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजच्या पहिल्या शिखर परिषदेत बोलताना जयशंकर यांनी भाष्य केले. भविष्यात भारताची काय रणनीती असणार यावर जाहीरपणे भाष्य केले. जयशंकर यांनी म्हटले की, टॅरिफमुळे जागतिक व्यापार गणिते उलटली आहेत.  खर्च नव्हे तर मालकी आणि सुरक्षितता हे आर्थिक व्यवहारांचे प्रमुख निकष बनले आहेत.

भारत यादरम्यान असाधारण अस्थिरता अनुभवत आहे. जागतिक उत्पादनाचा एक तृतीयांश भाग एकाच भौगोलिक प्रदेशात चीन केंद्रित आहे, पुरवठा साखळी मर्यादित आहेत. आपल्याला सध्या स्वदेशी वस्तूंवर आधारित राहावे लागेल आणि हाच सर्वात चांगला मार्ग आहे. टॅरिफमुळे आपल्या बाजारपेठेचा आपण कसा उपयोग करूव घ्यायचा हे माहिती होतंय. स्वदेशी वस्तूंवर आधारित राहिल्याने आपल्याला फायदा नक्कीच होईल.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे भारत हा वेगाने डेटा पॉवर बनवत आहे. डेटा सेंटर्स बांधले जात आहेत आणि नोएडा आणि दक्षिण भारतात प्रमुख केंद्रे विकसित होत आहेत. डेटा ही भविष्याची भारताची ऊर्जा असून भारत त्याचे केंद्र बनत आहे. शस्त्रे बनवण्याची पद्धत बदलली असून ते अधिक धोकादायक बनवली जात आहेत. तंत्रज्ञानामुळे सार्वभौमत्वावर परिणाम झाला आहे.

अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्ट इशारा देत एस. जयशंकर यांनी म्हटले की, जर ट्रम्प टॅरिफचा वापर युद्धाचे शस्त्र म्हणून करत असतील तर भारत त्यांच्या 3D चा वापर नवीन रणनीतीचे शस्त्र म्हणून करेल. पहिल्यांदाच भारताने यावर थेटपणे भाष्य केले. काही दिवसांपूर्वीच एस. जयशंकर हे अमेरिकेच्या दाैऱ्यावर होते, यावेळी त्यांनी अमेरिकेत थेट ब्रिक्स देशांची बैठक घेतली. ब्रिक्स समुहाला डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विरोध सुरूवातीपासूनच आहे.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....