पाकिस्तानमधील भारतीय अधिकाऱ्यांचा छळ, परराष्ट्र मंत्रालय आक्रमक

नवी दिल्ली : भारताच्या पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांचा पाकिस्तानकडून छळ होत असल्याचा आरोप आहे. याविरोधात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र आक्षेप घेतला आहे. शिवाय या घटनांची तातडीने चौकशी करण्याची मागणी भारताने केली आहे. भारताने बुधवारी अधिकृतपणे याविरोधात भूमिका जाहीर केली. सूत्रांच्या मते, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला 18 मार्च रोजी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक नोट व्हर्बल जारी (डिप्लोमॅटिक पत्र) …

India pakistan diplomatic relations, पाकिस्तानमधील भारतीय अधिकाऱ्यांचा छळ, परराष्ट्र मंत्रालय आक्रमक

नवी दिल्ली : भारताच्या पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांचा पाकिस्तानकडून छळ होत असल्याचा आरोप आहे. याविरोधात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र आक्षेप घेतला आहे. शिवाय या घटनांची तातडीने चौकशी करण्याची मागणी भारताने केली आहे. भारताने बुधवारी अधिकृतपणे याविरोधात भूमिका जाहीर केली.

सूत्रांच्या मते, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला 18 मार्च रोजी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक नोट व्हर्बल जारी (डिप्लोमॅटिक पत्र) केलं आहे, ज्यात दोन पाकिस्तानी कर्मचाऱ्यांकडून भारतीय नौदलाच्या सल्लागारांचा पाठलाग केल्याप्रकरणी सविस्तर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. नौदलाचे सल्लागार त्यांच्या घरातून उच्चायुक्तालयात जात असताना दोन पाकिस्तानी कर्मचाऱ्यांनी एका कारमधून त्यांचा पाठलाग केल्याचं नोट व्हर्बलमध्ये म्हटलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भारताच्या पाकिस्तानमधील एका अधिकाऱ्याला फेक कॉल करुन त्रास देण्यात आला, तर एका कर्मचाऱ्याला 14 मार्च रोजी एका पाकिस्तानी कर्मचाऱ्याच्या रोषाचा सामना करावा लागला.

भारतीय अधिकाऱ्यांचा जो छळ केला जातोय, त्याची पाकिस्तानने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी भारताने केली आहे. भारताने 13 मार्च रोजीही पाकिस्तानला अशाच पद्धतीची नोट व्हर्बल जारी केली होती, ज्यात 8 ते 11 मार्च या काळात भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांचा छळ केल्याप्रकरणी आक्षेप नोंदवण्यात आला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *