इराणकडून चूक मान्य, युक्रेनच्या विमानावर क्षेपणास्त्र हल्ला, 176 प्रवाशांचा मृत्यू

इराणकडून चूक मान्य, युक्रेनच्या विमानावर क्षेपणास्त्र हल्ला, 176 प्रवाशांचा मृत्यू

बुधवारी (8 जानेवारी) इराणने इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. यामध्ये अमेरिकेचे तळ उध्वस्त झाले होते. या हल्ल्यानंतर लगेच इराणमध्ये विमान अपघात घडला होता. या अपघातात सर्व 176 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

चेतन पाटील

|

Jan 11, 2020 | 12:22 PM

तेहरान : विमान अपघात प्रकरणी इराणने आपली चूक मान्य केली आहे (Iran accepted mistake on Ukrainian plane crash). आपल्याकडून चुकून ते विमान पाडलं गेल्याची कबूली इराणने दिली आहे. याअगोदर इराणने तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याचे सांगितले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर अपघाताच्या चौकशीची मागणी सुरु होताच इराणने आपली चूक मान्य केली आहे (Iran accepted mistake on Ukrainian plane crash).

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव टोकाला गेला आहे. बुधवारी (8 जानेवारी) इराणने इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. यामध्ये अमेरिकेचे तळ उध्वस्त झाले होते. या हल्ल्यानंतर लगेच इराणमध्ये विमान अपघात घडला होता. या अपघातात सर्व 176 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

इराणमध्ये अपघात झालेले विमान हे युक्रेन इंटरनॅशनल एअरलाइन्सचे होते. या विमानात इराणचे 82 प्रवासी होते. यासोबतच कॅनडाचे 63, युक्रेचे 11, स्वीडनचे 10, अफगाणिस्तानचे 4, जर्मनीचे 3 तर युकेचे 3 प्रवासी होते.

इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर या अपघातावर संशय व्यक्त केला जात होता. कॅनडा आणि ब्रिटनच्या नेत्यांनी या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती.

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव टोकाला गेला आहे. अमेरिकेने इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांची हत्या केली. त्यानंतर इराणने इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर हल्ला केला. त्यानंतर लगेच इराणमध्ये विमान अपघाताची घटना घडली. या अपघातावर संशय व्यक्त केला जात होता. हा अपघात नसून हल्ला असल्याची शक्यता वर्तवली जात होती.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी इराणकडूनच विमानावर क्षेपणास्त्रचा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर आज खुद्द इराणने आपली चूक मान्य केली आहे.

संबंधित बातम्या :

अमेरिका-इराण तणाव शिगेला, तेहरानजवळ विमान कोसळून 176 प्रवाशांचा मृत्यू

इराणचं अमेरिकेला प्रत्युत्तर, अमेरिकेच्या इराकमधील दोन सैन्य ठिकाणांवर हल्ला

आखाती देशात युद्धाची शक्यता, इराणमध्ये मशिदीवर लाल झेंडा, अमेरिकेचं ड्रोनही पाडलं

जगावर तिसऱ्या महायुद्धाचं सावट, युद्ध झालंच तर ‘हे’ देश येणार समोरासमोर

अमेरिकेच्या नाकी नऊ आणणारे इराणचे जनरल कासिम सुलेमानी ठार, अमेरिकेचं ‘सर्जिकल स्ट्राईक’

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें