इराण-ब्रिटन-अमेरिकेच्या वादात भारतीयांचे हाल, 54 पैकी 9 भारतीयांची सुटका

इराणकडून पकडण्यात आलेल्या पनामाच्या टँकरमधील (Panama-flagged tanker) 12 पैकी 9 भारतीय क्रू मेंबरची सुटका झाली आहे. इराणने 14 जुलैला पनामाचं टँकर (Panama-flagged tanker ) ताब्यात घेतलं होतं, ज्यात 12 भारतीय क्रू मेंबर होते.

इराण-ब्रिटन-अमेरिकेच्या वादात भारतीयांचे हाल, 54 पैकी 9 भारतीयांची सुटका
Follow us
| Updated on: Jul 26, 2019 | 4:46 PM

नवी दिल्ली : इराणकडून पकडण्यात आलेल्या पनामाच्या टँकरमधील (Panama-flagged tanker) 12 पैकी 9 भारतीय क्रू मेंबरची सुटका झाली आहे. इराणने 14 जुलैला पनामाचं टँकर (Panama-flagged tanker ) ताब्यात घेतलं होतं, ज्यात 12 भारतीय क्रू मेंबर होते. यापैकी 9 जणांची सुटका करण्यात आली असून उर्वरित तीन जणांचीही लवकरच सुटका केली जाईल, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. इराणने एमटी रिया (MT Riah ship) हे टँकर ताब्यात घेत यातून बेकायदेशीरपणे तेलाची वाहतूक केली जात असल्याचा आरोप केला होता. स्ट्रेट ऑफ हर्मूजमध्ये (Straight of Hormuz) इराणने ही कारवाई केली होती.

14 जुलै रोजी एमटी रिया (MT Riah ship) टँकरने इराणच्या समुद्रात प्रवेश केला आणि त्यानंतर काही वेळातच संपर्क तुटला होता. नंतर हे टँकर ताब्यात घेतलं असल्याची माहिती इराणने दिली, ज्यात 12 भारतीयांचा समावेश होता.

अजून 21 भारतीय इराणच्या ताब्यात

दरम्यान, अजूनही इराणच्या ताब्यात 21 भारतीय क्रू मेंबर्स आहेत. एमटी रिया टँकरवरील तीन आणि ब्रिटनच्या स्टेना एम्पिरियो जहाजावरील 18 भारतीय इराणच्या ताब्यात आहेत. गेल्या आठवड्यात ब्रिटनचं स्टेना एम्पिरियो टँकर इराणने ताब्यात घेतलं होतं.

ब्रिटनचं टँकरही इराणच्या ताब्यात

स्टेना एम्पिरियो आणि 23 क्रू मेंबर्ससह इराणने कारवाई केली होती. आंतरराष्ट्रीय समुद्रीय नियम तोडल्याचा आरोप करत इराणने बंदर अब्बासवर ही कारवाई केली. यानंतर ब्रिटन आणि इराणमधील संबंधही तणावाचे बनले आहेत. 18 भारतीयांशिवाय यामध्ये तीन रशियन, एक लॅटवियन आणि एक फिलिपिन्सचा व्यक्ती आहे.

सर्व भारतीय क्रू मेंबर्स सुरक्षित

दरम्यान, भारताला तातडीने इराणकडून कौन्सिलर एक्सेस देण्यात आलं होतं. सर्व 18 क्रू मेंबर्स सुखरुप असून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं. सोमवारी इराणने काही फोटोही प्रसिद्ध केले होते, ज्यात भारतीय क्रू मेंबर गप्पा मारताना दिसले.

टँकर पकडण्याच्या कारवायांमुळे पाश्चिमात्य देश आणि इराणमध्ये संबंध कमालीचे ताणले आहेत. इराणकडून तेल घेणाऱ्या देशांवरही सँक्शन लावले जातील, असं अमेरिकेने एप्रिलमध्ये स्पष्ट केलं होतं. त्यानंतर हे संबंध तणावाचे होण्यास सुरुवात झाली.

ब्रिटनने इराणचं टँकर पकडलं, 24 भारतीय ताब्यात

दरम्यान, इराणने ब्रिटनला एक ऑफरही दिली होती. स्टेना एम्पिरियोच्या बदल्यात इराणचं ब्रिटनने पकडलेलं टँकर परत द्यावं, अशी ही ऑफर होती. जिब्राल्टरजवळ इराणचं टँकर ब्रिटनकडून पकडण्यात आलं होतं, जे सीरियासाठी तेल निर्यात करत होतं. पण सीरियावर आंतरराष्ट्रीय सँक्शन्स असल्यामुळे तेल पुरवठा केला जाऊ शकत नाही, असं म्हणत ब्रिटनने इराणियन टँकर ताब्यात घेतलं, ज्यामध्ये 24 भारतीयांचाही समावेश आहे.

दोघांच्या वादात तिसऱ्याचे हाल

तेलवाहू टँकरवर बहुतांश भारतीय क्रू मेंबर असतात. त्यामुळे इराणमधून आयात-निर्यात होणाऱ्या टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीयांचा समावेश असतो. ब्रिटनने इराणचं टँकर जप्त केलं, ज्यात 24 भारतीय होते, तर इराणने दोन टँकर ताब्यात घेतले ज्यात एकूण 30 भारतीय होते. ब्रिटन आणि इराणमध्ये मिळून 54 भारतीय क्रू मेंबर्स होते. पण यापैकी 9 जणांची सुटका करण्यात आली होती.

ब्रिटनमध्ये सर्व प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने होईल याची खात्री आहे. मात्र इराणमध्ये कारवाई करण्यात आल्यानतंर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आक्रमक भूमिका घेतली होती. आमच्या नागरिकांना तातडीने सोडून देण्यात यावं, अशी मागणी भारताने केली. सर्व भारतीय क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याची माहिती इराणने दिली होती.

स्ट्रेट ऑफ हर्मूज

ओमन आणि इराण यांच्या मधोमध असलेल्या स्ट्रेट ऑफ हर्मूजवर इराणचं नियंत्रण आहे. आखाती देशांमधील सर्वात मोठा तेल साठा निर्यात याच मार्गाने केला जातो. पण स्ट्रेट ऑफ हर्मूजमध्ये जहाचं रोखून इराण अमेरिका आणि इतर पश्चिम देशांवर दबाव टाकण्याचा  प्रयत्न करत आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.