Russia-Ukraine War : काय वेळ आली या देशावर? गहू-सोयाबीनच्या बदल्यात रशियाला देतोय मिसाइल

Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाला दोन वर्षापेक्षा जास्त काळ लोटलाय. या युद्धामुळे जगाची तीन गटात विभागणी झाली आहे. एक युक्रेनच्या बाजूने, दुसरे रशियाच्या आणि तिसरे तटस्थ. या युद्धामुळे एका देशावर गहू-सोयाबीनसाठी रशियाला मिसाइल देण्याची वेळ आली आहे.

Russia-Ukraine War : काय वेळ आली या देशावर? गहू-सोयाबीनच्या बदल्यात रशियाला देतोय मिसाइल
Russia-Ukraine War
Follow us
| Updated on: Sep 10, 2024 | 10:42 AM

रशिया-युक्रेन युद्धात काही देश रशियाच्या बाजूने तर काही देश युक्रेनच्या बाजूने आहेत. युक्रेनला अमेरिका आणि नाटो देशांकडून आर्थिक तसेच लष्करी ताकद दिली जात आहे. रशियाला इराणकडून थेट लष्करी मदत मिळते असा अनेकदा दावा करण्यात आलाय. इराणकडून रशियाला मिसाइल आणि ड्रोन्स पुरवठा सुरु आहे असा आरोप अनेकदा करण्यात आलाय. आता इराणच्या एका खासदाराने यावर शिक्कामोर्तब केलय. इराणकडून रशियाला बॅलेस्टिक मिसाइल्सचा पुरवठा सुरु असल्याच्या मीडिया रिपोर्टची पृष्टी केलीय. अहमद बख्शायेश अर्देस्तानी यांनी ही माहिती दिलीय. ते इराणच्या संसदेचे तसेच राष्ट्रीय सुरक्षा आणि विदेश धोरण समितीचे सदस्य आहेत.

इराण रशियाला ड्रोन्स आणि मिसाइल देत आहे असं अमेरिकन वर्तमानपत्र द वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. इराणच्या संयुक्त राष्ट्र मिशनने हे वृत्त फेटाळून लावलय. आता इराणच्या एका खासदाराने पुरवठा सुरु असल्याच मान्य करुन इराणविरोधी शक्तींना प्रोत्साहन दिलं आहे. “आम्हाला आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सामानाच्या बदल्यात सामना बार्टर एक्सजेंच करावं लागतं. सोयाबीन-गहू सारख्या गोष्टी आम्हाला बार्टरद्वारे विकत घ्याव्या लागतात. रशियाला मिसाइल निर्यात हा आमच्या बार्टर सिस्टिमचा भाग आहे” असं अहमद बख्शायेश अर्देस्तानी म्हणाले. त्यांनी ‘दिदवाना इराण’ ला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला.

यापेक्षा अजून काय वाईट होऊ शकतं?

अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी इराणवर अनेक प्रकारचे प्रतिबंध घातले आहेत. त्यामुळे ते डॉलरने व्यापार करु शकत नाहीत. इराण सामानाच्या बदल्यात सामान देऊन आपल्या गरजा पूर्ण करतो. रशियाला क्षेपणास्त्र पुरवठ्यामुळे इराणवर आणखी प्रतिबंध येऊ शकतात, या प्रश्नावर अर्देस्तानी म्हणाले की, “यापेक्षा अजून काय वाईट होऊ शकतं? आम्ही हिजबुल्लाह, हमास आणि हशद अल-शाबीला क्षेपणास्त्र देतो, मग रशियाला का नाही देऊ शकत?”

आम्ही शस्त्र विकून डॉलर घेतो

“आम्ही शस्त्र विकून डॉलर घेतो. रशियासोबत भागीदारीमुळे प्रतिबंधाने फरक पडत नाही. आम्ही रशियाकडून सोयाबीन, मक्का आणि अन्य सामानाची आयात करतो. युरोपियन देश युक्रेनला शस्त्र विकतात. नाटो युक्रेनमध्ये घुसला आहे. मग आम्ही आमचा सहकारी रशियाला मिसाइल, ड्रोन देऊन मदत करु शकत नाही का?” असं अर्देस्तानी म्हणाले.

'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?
'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?.
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?.
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल.
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?.
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला...
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला....
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?.
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?.
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली.
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?.
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका.