युद्धाचे ढग! इराणने अमेरिकेच्या युद्धनौकेपासून अवघ्या 100 मैलांवर डागली मिसाईल

संपूर्ण युद्धाभ्यासाचे परीक्षण इराणच्या राष्ट्रीय लष्कराचे प्रमुख अब्दुल रहीम मोसावी करीत आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:53 PM, 19 Jan 2021
युद्धाचे ढग! इराणने अमेरिकेच्या युद्धनौकेपासून अवघ्या 100 मैलांवर डागली मिसाईल

तेहरान: इराणच्या सैन्याने मंगळवारी ओमानच्या आखाताच्या किनाऱ्यापासून युद्धाभ्यासाला सुरुवात केलीय. तिथल्या सरकारी टीव्ही वाहिनीने ही माहिती दिली. अमेरिकेने गेल्या काही दिवसांपासून इराणच्या आण्विक कार्यक्रमावरील दबाव वाढवलाय. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलाय. या वाढलेल्या तणावानंतर इराणने सैनिकी कवायती घेण्याची ही नवी मालिका सुरू झालीय. कमांडो सैन्य आणि विमाने जे सैनिक रणांगणात नेले जात आहेत, ते यंदाच्या युद्धाभ्यासात भाग घेत आहेत. याबरोबरच लढाऊ विमान, हेलिकॉप्टर, लष्करी मालवाहू विमानेही हेसुद्धा या युद्धसरावाचा एक भाग आहेत. संपूर्ण युद्धाभ्यासाचे परीक्षण इराणच्या राष्ट्रीय लष्कराचे प्रमुख अब्दुल रहीम मोसावी करीत आहेत. (Iran Started Military Drill In Gulf Of Oman)

इराणने सैनिकी तयारी केली तीव्र
अमेरिकेचा पुढील अध्यक्ष जो बायडन यांच्यावर दबाव वाढवण्याच्या धोरणाचा भाग म्हणून इराणने सैनिकी सज्जता वाढविली आहे. तसेच इराणबरोबर टाकलेल्या दबावांच्या करारापासून अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला वेगळे करून घेतले आहे. जर इराणची अरेरावी सुरूच राहिली, तर आण्विक कार्यक्रम थांबविण्याच्या या बहुपक्षीय करार अमेरिका पुन्हा लादू शकेल. यापूर्वी शनिवारी इराणच्या निमलष्करी दलाच्या क्रांतिकारक गार्ड आणि गेल्या गुरुवारी नौदलाने युद्धसराव केले होते. शुक्रवारी ‘ग्रेट प्रॉफिट 15’ युद्धसरावादरम्यान मोबाईल लाँचरमधून वाळवंटात एकाच वेळी अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली.

इराणने अमेरिकन जहाजापासून अवघ्या 100 मैलांवर क्षेपणास्त्र डागले
एकीकडे हिंद महासागरात अण्वस्त्रसज्ज अमेरिकन विमानवाहू युद्धनौका यूएसएस निमित्झ उभी आहे, तर दुसरीकडे इराण युद्धामध्ये आपले विध्वंसक शस्त्रांचं प्रदर्शन करीत आहे. युद्धाच्या माध्यमातून इराण आत्मघातकी ड्रोनसारख्या शस्त्राने शत्रूला हादरवून सोडण्याची तयारी करीत आहे. या परिस्थितीमुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढू शकतो. फॉक्स टीव्हीच्या अहवालानुसार, हिंद महासागरातील व्यावसायिक जहाजापासून केवळ इराणी क्षेपणास्त्र 20 मैलांच्या अंतरावर पाडले. इथून अमेरिकन जहाजाचे अंतर अवघ्या 100 मैलांचे होते. यासंदर्भात अमेरिकन सैन्याने असे म्हटले आहे की, अशा क्षेपणास्त्र चाचण्या अनेकदा इराणकडून केल्या जातात.

संबंधित बातम्या

Donald Trump Impeachment | डोनाल्ड ट्रम्प: दुसऱ्यांदा महाभियोग, सर्वात बलाढ्य लोकशाहीतील सत्तापेच

पाकिस्तानच्या इज्जतीचा फालूदा, पैसे न भागवल्याने ‘मित्र’ देशाकडून प्रवासी विमान जप्त

Iran Started Military Drill In Gulf Of Oman