अमेरिकेच्या नाकी नऊ आणणारे इराणचे जनरल कासिम सुलेमानी ठार, अमेरिकेचं 'सर्जिकल स्ट्राईक'

इराणच्या रिव्हॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचा (IRGC) प्रमुख आणि जनरल कासिम सुलेमानी अमेरिकेच्या हल्ल्यात ठार झाला आहे (Iranian general qasem soleimani killed).

अमेरिकेच्या नाकी नऊ आणणारे इराणचे जनरल कासिम सुलेमानी ठार, अमेरिकेचं 'सर्जिकल स्ट्राईक'

बगदाद (इराण) : इराणच्या रिव्हॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे (IRGC) प्रमुख आणि जनरल कासिम सुलेमानी अमेरिकेच्या हल्ल्यात ठार झाले आहेत (Iranian general qasem soleimani killed). अमेरिकेने बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी (3 जानेवारी) सकाळी हल्ला करत सुलेमानी यांना ठार केलं. अमेरिकेने सुलेमानी यांच्यावर अमेरिकेच्या दुतावासावरील हल्लात सहभागी असल्याचा आरोप केला आहे.

अलजझीरा या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेचा रक्षा विभाग पेंटागनने इराकमध्ये कासिम सुलेमानी यांना मारल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हा हल्ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार करण्यात आला. याचा उद्देश इराणकडून भविष्यात होणारे हल्ले रोखण्याचा होता, अशी माहिती पेंटागनने दिली आहे. या हल्ल्यात सुलेमानी यांच्या व्यतिरिक्त इराकी मिलिशिया कमांडर अबू महदी अल-मुहान्दिस देखील मारला गेला आहे.

व्हाईट हाऊसने याबाबत एक ट्विट करत माहिती दिली आहे. यात म्हटलं आहे, की “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशात तैनात असलेल्या अमेरिकेच्या सैनिकांच्या संरक्षणासाठी निर्देश दिले होते. त्यानुसारच ही निर्णायक कारवाई करुन IRGC चा प्रमुख कासिम सुलेमानीला मारण्यात आलं आहे. अमेरिकेने त्याला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे.”

जनरल सुलेमानी इराक आणि आजूबाजूच्या क्षेत्रात अमेरिकेच्या राजदुतांवर हल्ला करण्याचं षडयंत्र रचत होता, असाही आरोप अमेरिकेने केला आहे.

जनरल कासिम सुलेमानी कोण होते?

  • मेजर जनरल कासिम सोलेमानी इराणचे सर्वोच्च नेते आयतोल्लाह अली खामेनेई यांचे अत्यंत विश्वासू मानले जात होते. त्यांना भविष्यातील इराणचे मजबूत नेते म्हणूनही पाहिलं जात होते. ते आपल्या कामाची माहिती थेट खामेनेई यांनाच द्यायचे.
  • रिव्हॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्सची परदेशी तुकडी कुद्स फोर्सचे ते प्रमुख होते. त्यांचा केवळ इराणच नाही, तर इराकमध्ये देखील प्रभाव होता.
  • बगदादला ISIS पासून वाचवण्यात कासिम सोलेमानी यांची मोठी भूमिका होती. यासाठी जनरल सोलेमानी यांच्या मदतीनेच पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सची स्थापना करण्यात आली होती.
  • सोलेमानी यांना अमेरिकेच्या सर्वात मोठ्या शत्रूंपैकी एक मानलं जात होतं. 1980 च्या दशकात इरान आणि इराकमध्ये युद्ध झालं. तेव्हा ते सद्दाम हुसैन यांच्याविरोधात लढले. त्यावेळी अमेरिका सद्दाम हुसैन यांच्याबाजूने होती.
  • पश्चिम आशियात इराणच्या महत्त्वपूर्ण हालचालींमागे जनरल सोलेमानी यांचीच रणनीती असल्याचंही मानलं जातं.
  • ISIS सारख्या दहशतवादी संघटनेशी लढण्याचा जनरल कासिम सोलेमानी यांनी कुर्द सैन्याची आणि शिया मिलिशिया यांची एकजुट केली होती.
  • जनरल कासिस आणि अमेरिका सीरियाच्या मुद्द्यावर एकाच बाजूने होते. दोघांचाही बशर-अल-असद सरकारला पाठिंबा होता. तरिही ते इराक आणि सीरियातील अमेरिकी हस्तक्षेपाच्या विरोधात होते. यातूनच ते अमेरिकेच्या शत्रूंच्या यादीत गेल्याचं सांगितलं जातं.
  • सोलेमानी यांनीच शस्त्रसज्ज हिजबुल्लाह आणि फिलिस्तानमध्ये सक्रिय दहशतवादी संघटनांना पाठिंबा दिल्याचंही बोललं जातं.
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *